Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Shiva Zee Marathi Serial : बंद करा आता, काहीही दाखवता; शिवा मालिकेच्या पहिल्याच एपिसोडच्या 'त्या' दृष्यावर नेटकरी चवताळले
Shiva Zee Marathi Serial : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची जोरदार शर्यत सुरू आहे. 'झी मराठी'ने (Zee Marathi) नुकत्याच दोन नव्या मालिका सुरू केल्या आहेत. पहिल्याच दिवशी तांत्रिक कारणाने प्रसारीत न झालेली मालिका शिवा (Shiva) ही मालिका मंगळवारी प्रसारीत झाली. मात्र, या मालिकेतील एक दृष्य सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या दृष्यावर नेटकऱ्यांनी 'झी मराठी'च्या मालिकेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हे दृष्य झी मराठीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Kedar Shinde : अखेर 'कलर्स मराठी'ने डाव टाकला, केदार शिंदे यांनी केली मोठी घोषणा
Marathi TV Serial : मराठी छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची स्पर्धा सुरू आहे. स्टार प्रवाह (Star Pravah), झी मराठी (Zee Marathi) या आघाडीच्या वाहिन्यांकडून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी नवीन मालिकांची घोषणा करण्यात आली आहे. तर, काही नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. टीआरपीच्या शर्यतीत आता कलर्स मराठीकडून (Colors Marathi) नवा डाव टाकण्यात आला आहे. कलर्स वाहिनीवर (Colors Marath Channel) नवी मालिका सुरू करण्यात येत असल्याची घोषणा चॅनलचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Singham 3 Movie : 'सिंघम 3' मधल्या अर्जुन कपूरचा खुंखार व्हिलनचा फर्स्ट लूक आउट ; रोहित शेट्टी म्हणाला, जो चुका करतो तो...
Singham 3 Movie : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) अॅक्शनपट असलेल्या 'सिंघम' चित्रपटाच्या (Singham) तिसऱ्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या 'सिंघम अगेन'मध्ये (Singham Again) अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा खलनायकी भूमिका साकारणार आहे. बुधवारी, त्याने पोस्टर लाँच केले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
National Film Award Indira Gandhi Nargis Dutt : इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचे नाव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून वगळले
National Film Award Indira Gandhi Nargis Dutt : देशात मानाचा समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या (National Film Award) श्रेणीत बदल करण्यात आले. त्यानुसार, आता चित्रपट पुरस्कार श्रेणीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त (Nargis Dutt) यांची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Mithila Palkar : मराठमोळी मिथिला पालकर दाखवणार आता तामिळ सिनेसृष्टीत जलवा; 'या' चित्रपटात झळकणार
Mithila Palkar Latest Updates : अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) आता बॉलिवूडनंतर (Bollywood) आता तामिळ चित्रपटांमध्ये (Tamil Movie) झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. यावेळी मिथिला चित्रपटाच्या टीम सोबत उपस्थित होती. ‘ओहो एन्थान बेबी' ( Oho Enthan Baby) या तामिळ चित्रपटातून मिथिला तामिळ सिनेसृष्टीत प्रवेश करणार आहे.