Pakistan Economic Crisis: आपल्या शेजारी असणारा जेश पाकिस्तान (Pakistan)  सध्या मोठ्या आर्थिक संकटात (Economic Crisis) सापडला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याची स्थिती आहे. त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सध्या पाकिस्तानला दिसत नाही.


दरम्यान, स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (SBP) ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2023 पर्यंत त्यांची एकूण कर्जे आणि दायित्वे 27.2 टक्क्यांनी वाढून 81.2 ट्रिलियन रुपये (131 अब्ज डॉलर) झाली आहेत. गेल्या वर्षभरात देशाच्या कर्जात 17.4 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत हा आकडा 63.83 लाख कोटी रुपये होता.


IMF कडे मागितलं कर्ज 


दिवसेंदिवस पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा आणखी वाढत जाणार आहे. पाकिस्तानने आयएमएफकडे आणखी एक बेलआउट पॅकेज मागितले आहे. याशिवाय देशात राजकीय स्थिरतेचे वातावरण नाही. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत देशातील कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तान आर्थिक आणि राजकीय आघाडीवर अपयशी ठरताना दिसत आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या मते, या परिस्थितीचे सर्वात मोठे कारण म्हणजे बाह्य कर्ज आणि व्याजाचा भरणा. IMF, FDI आणि इतर स्त्रोतांकडून मिळालेली कर्जे 26.17 टक्क्यांनी वाढून 33.611 ट्रिलियन रुपये झाली आहेत. केवळ आयएमएफचे कर्ज 24.17 टक्क्यांनी वाढून 2.142 ट्रिलियन रुपये झाले आहे.


दररोज सरासरी 48 अब्ज रुपयांची कर्जे वाढली


मिळालेल्या माहितीनुसार, एकूण दायित्व 27.51 टक्क्यांनी वाढून 4.6 ट्रिलियन रुपये झाले आहे. FY24 च्या पहिल्या सहामाहीत, कर्ज आणि दायित्व सेवा 28.82 टक्क्यांनी वाढून 5.7 ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचली आहे. डिसेंबर 2022 पासून पाकिस्तानचे कर्ज जवळपास दररोज सरासरी 48 अब्ज रुपयांनी वाढत आहे.


आधीच काळजीवाहू सरकारचा (पाकिस्तान सरकार) सामना करत असलेला देश आता नव्या सरकारची वाट पाहत आहे. तुरुंगात असलेल्या इम्रान खानच्या समर्थकांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. पण, लष्कर देशाचे सरकार त्याच्या हाती सत्ता देण्याच्या मनस्थितीत नाही. येणाऱ्या सरकारसाठी हे कर्ज सर्वात मोठे संकट ठरणार आहे. अलीकडेच, पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने देखील खुलासा केला होता की 2022-23 या वर्षात कर्ज खूप वाढण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Pakistan Election : पाकिस्तानात अब की बार त्रिशंकू सरकार; जेलमध्ये असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षाला तरुणांचे बळ!