Shiva Zee Marathi Serial : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची जोरदार शर्यत सुरू आहे. 'झी मराठी'ने (Zee Marathi) नुकत्याच दोन नव्या मालिका सुरू केल्या आहेत. पहिल्याच दिवशी तांत्रिक कारणाने प्रसारीत न झालेली मालिका शिवा (Shiva) ही मालिका मंगळवारी प्रसारीत झाली. मात्र, या मालिकेतील एक दृष्य सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या दृष्यावर नेटकऱ्यांनी 'झी मराठी'च्या मालिकेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हे दृष्य झी मराठीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले आहे. 


काय आहे या दृष्यात?


मालिकेच्या या एपिसोडमध्ये आशुने दिव्याला इम्प्रेस करण्यासाठी हातात विषारी साप पकडल्याचं दाखवलं आहे. वीएफएक्सच्या माध्यमातून हा साप दाखवण्यात आला आहे. मात्र, त्यावर नेटकऱ्यांनी त्याची थट्टा उडवण्यास सुरुवात केली आहे.



नेटकरी चवताळले


झी मराठीने पोस्ट केलेल्या शिवा मालिकेतील या दृष्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने  कार्टून दाखवताय का लहान मुलांना? असा सवाल केला आहे. तर आणखी एका युजरने ‘कार्टून पण यापेक्षा चांगल दाखवतात, असे म्हणत मालिकेतील व्हीएफएक्सच्या दर्जावर प्रश्न उपaस्थित केले. एका युजरने 'सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधला नाग आता झीवरच्या इतर सगळ्या मालिकांमध्ये वापर करणार वाटतं, असे म्हटले. तर, काहींनी जुन्या मालिकाच दर्जेदार असल्याचे म्हटले.  एका युजरने ‘काय फालतू मालिका आहे, बंद करा काहीही दाखवतात’, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 










 




ओडिया भाषेतील मालिकेचा रिमेक 


'शिवा' ही मालिका ही  ओडिया मालिका  'सिंदूरा बिंदू' या मालिकेचा रिमेक आहे. ही मालिका 'मीत' या नावाने हिंदीत प्रसारीत झाली होती. 


'या' अभिनेत्याचं कमबॅक


काही वर्षांपूर्वी झी मराठीवर आलेल्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ओम म्हणजेच अभिनेता शाल्व खिंजवडेकर या 'शिवा' या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच शिवा भूमिकेतच अभिनेत्री पूर्वा फडके ही मुख्य भूमिकेत दिसरणार आहे. 


ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर (Pradeep Velankar) यांची दुसरी कन्या आणि अभिनेत्री मधुरा वेलणकरची (Madhura Velankar) बहिण मीरा वेलणकर (Meera Velankar) ही देखील आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे. मीरा वेलणकर ही झी मराठीवरील 'शिवा' या नव्या मालिकेत झळकणार आहे. 'शिवा' मध्ये मीराची महत्त्वाची भूमिका आहे. मीरा वेलणकर या मालिकेतील मुख्य व्यक्तीरेखा असलेल्या आशूची आई सीताईची व्यक्तिरेखा साकारणार आहे.