Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..


 


Ritiesh Deshmukh : मराठीनंतर रितेश देशमुख हिंदी बिग बॉसही होस्ट करणार? सलमानला रिप्लेस करण्यावर म्हणाला...


Ritiesh Deshmukh : प्रेक्षकांना मागील दोन वर्षांपासून ज्या शोची उत्सुकता होती, तो कार्यक्रम अखेर येत्या 28 जुलै पासून भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या (Bigg Boss Marathi Season 5) सिझनबाबत सध्या सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातच या सिझनमध्ये होस्टच्या खुर्चीत यंदा रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) बसणार आहे. त्यामुळे रितेशची एन्ट्री ही चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज होती. पण आता रितेश स्पर्धकांची शाळा कशी घेणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Marathi Movies Updates :  सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान पहिल्यांदाच एकत्र झळकणार, 'हॅशटॅग तदेव लग्नम'मध्ये सांगणार परिपक्व नातेसंबंधाची गोड गोष्ट


Subodh Bhave Tejashree Pradhan Marathi Movies Updates :  अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) यांची जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आगामी 'हॅशटॅग तदेव लग्नम'या चित्रपटात ही जोडी झळकणार आहे. तरुणाईच नव्हे तर कुटुंबालादेखील या चित्रपटाचा विषय भावणार असल्याचा विश्वास दिग्दर्शक आनंद गोखले यांनी व्यक्त केला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Anant-Radhika Reception : लग्न नाही पण रिसेप्शनला मराठी अभिनेत्रींचा जलवा, अंबानींच्या सोहळ्यात अमृता खानविलकरसह 'या' अभिनेत्रींचा सहभाग


Anant-Radhika Reception :  संपूर्ण बॉलीवूड ज्या सोहळ्यात उपस्थित होतं, त्या सोहळ्यात आता मराठी कलाकारांचा देखील जलवा पाहायला मिळाला आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला मराठी अभिनेत्रींच्या उपस्थितीने विशेष लक्ष वेधून घेतलं. अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), प्रियांका बर्वे (Priyanak Barve), गिरिजा गोडबोले (Girija Godbole) हे कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


John Cena On Anant Ambani Radhika Merchant Wedding :  WWE स्टार जॉन सीनाला भावला अंबानींचा पाहुणचार, किंग खानचे कौतुक करत म्हणाला...


John Cena On Anant Ambani Radhika Merchant Wedding :  रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा लेक अनंत अंबानीच्या (Anant Ambani) शाही विवाह सोहळ्यात आणि त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात  देश-विदेशातील राजकीय, उद्योग, मनोरंजनसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. WWE सुपरस्टार जॉन सीनाने (John Cena) देखील अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावली होती. भारतीय पोषाखात  जॉन सीनाला पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Nita Ambani : ''लग्न घर आहे, माफ करा...'', वरमाई नीता अंबानी यांनी सगळ्यांसमोर हात का जोडले? पाहा व्हिडीओ



Nita Ambani Viral Video :  अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा शाही विवाह सोहळा (Anant Ambani Radhika Merchant Wedding) 12 जुलै रोजी पार पडला. नुकतेच 12 जुलै रोजी विवाह सोहळा पार पडल्यानंतर 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद कार्यक्रम आणि 14 जुलै रोजी ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्याआधी मार्च आणि मे महिन्यातही नेत्रदीपक प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व फंक्शन्समध्ये अंबानी कुटुंबाने देश-विदेशातील सेलिब्रिटी पाहुण्यांना आमंत्रित केले होते. आता लग्न आणि रिसेप्शन संपल्यानंतर नीता अंबानींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत नीता अंबानी यांनी कॅमेऱ्यासमोर सगळ्यांची माफी मागितली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 



Shivani Baokar Latest News :  शिवानी बावकर उतरणार कॉलेज राजकारणाच्या आखाड्यात, 'नेता गीता'मध्ये उलगडणार राजकारण ते प्रेम प्रकरणाचा प्रवास



Shivani Baokar Latest News :  कॉलेजच्या काळातलं राजकारण, त्यावेळची नेतागिरी हा रोचक काळ असतो. तारूण्यातली धमक दाखवण्याची ती एक संधी असते. कॉलेज जीवनातलं राजकारण ते प्रेम प्रकरण हा धमाल प्रवास 'नेता गीता' या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. अभिनेता सुधांशू महेश बुडुख या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..


 


Aaradhya Bachchan : एअरपोर्टवर पॅप्सवर ऐश्वर्याची लेक आराध्या संतापली; युजर्स म्हणाले, ''जया बच्चन...''


Aaradhya Bachchan Angry On Paparazzi :   बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) केवळ तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी इंडस्ट्रीत ओळखली जात नाही तर तिच्याकडे एक जबाबदार आई म्हणूनही पाहिले जाते. ऐश्वर्या नेहमीच आपली मुलगी आराध्यासोबत (Aaradhya Bachchan) सावलीसारखी फिरताना दिसली आहे. लग्नकार्य असो, कार्यक्रम असो किंवा विमानतळावर, ती नेहमीच आराध्यासोबत दिसते. आराध्या आणि ऐश्वर्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच ऐश्वर्याची लाडकी लेक पापाराझींवर संतापली असल्याचे दिसून आले. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..