Ritiesh Deshmukh : प्रेक्षकांना मागील दोन वर्षांपासून ज्या शोची उत्सुकता होती, तो कार्यक्रम अखेर येत्या 28 जुलै पासून भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या (Bigg Boss Marathi Season 5) सिझनबाबत सध्या सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातच या सिझनमध्ये होस्टच्या खुर्चीत यंदा रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) बसणार आहे. त्यामुळे रितेशची एन्ट्री ही चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज होती. पण आता रितेश स्पर्धकांची शाळा कशी घेणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 


दरम्यान रितेशने मराठी बिग बॉसच्या होस्टची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता हिंदीतही तो होस्टिंग करणारा का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच हिंदीत सलमानची रिप्लेसमेंट म्हणूनही रितेशचा विचार होऊ शकतो का, अशाही चर्चा सुरु आहे. पण यावर आता रितेशनेच भाष्य केलं असून त्याने हिंदीत होस्टिंग करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये रितेशने याविषयी भाष्य केलं आहे. 


रितेशने काय म्हटलं?


मराठीनंतर आता बिग बॉस हिंदीतही सलमानला रिप्लेस करण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला. त्यावर रितेशने म्हटलं की, हे मलाही माहितेय आणि तुम्हालाही माहितेय की, सलमान खानला बिग बॉसमध्ये कोणीही रिप्लेस करु शकत नाही. सलमान हा एकमेव आयकॉनिक आहे. त्यामुळे रितेश देशमुख हा हिंदी बिग बॉसच्या होस्टच्या खुर्चीत दिसणार नाही. 


प्रत्येक आठवड्यात झटका आणि मनोरंजनाचा धमाका


मराठी मनोरंजनाचा बाप... ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो... सुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या चर्चेला उधाण येतं, असा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम 'बिग बॉस मराठी' अवघ्या काही दिवसांत सुरू होत आहे. तारीख जाहीर झाल्याने यंदा कोणते स्पर्धक 'बिग बॉस मराठी'च्या घरात धूम करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ‘बिग बॉस मराठी'चं बिगुल आता वाजणार आणि  स्पर्धकांच्या करामतींचा आता कस लागणार!  प्रत्येक आठवड्यात लागेल  झटका, आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अशा गोष्टींनी बनलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची , अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा पहिला स्पर्धक ठरला? 'कोकण हार्टेड गर्ल'च्या नावाची जोरदार चर्चा