John Cena On Anant Ambani Radhika Merchant Wedding : रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा लेक अनंत अंबानीच्या (Anant Ambani) शाही विवाह सोहळ्यात आणि त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देश-विदेशातील राजकीय, उद्योग, मनोरंजनसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. WWE सुपरस्टार जॉन सीनाने (John Cena) देखील अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावली होती. भारतीय पोषाखात जॉन सीनाला पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
जॉन सीना याने 12 जुलै रोजी झालेल्या लग्न सोहळ्यात हजेरी लावली होती. त्याने या लग्नात धमाल केली असल्याचे व्हिडीओत दिसून आले. बॉलिवूड सेलिब्रेटींसोबत जॉन सीना वरातीमध्ये थिरकला होता. डोक्यावर फेटा बांधलेल्या जॉन सीनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अनंत-राधिकाच्या लग्नात अंबानी कुटुंबाकडून मिळालेल्या आदरातिथ्याबद्दल जॉन सीनाने एक पोस्ट शेअर केली आहे.
जॉन सीनाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाला उपस्थित राहण्याचा अनुभव शेअर केला आहे. जॉन सीनाने ट्वीटरवर म्हटले की, “24 तास हे माझ्यासाठी खूप सुखावणारे होते. अंबानी कुटुंबियांच्या अतुलनीय प्रेमळपणा व आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे”.
जॉन सीनाने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, या काळात अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवण्यास मिळाले. अनेक नवीन मित्र मिळाले. शाहरु खानमुळे माझ्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम कसा झाला, हे त्याला सांगू शकलो असल्याचेही जॉन सीनाने सांगितले. जॉन सीनाची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना भेटल्यानंतरही जॉन सीनाने फक्त शाहरुख खानचा उल्लेख केल्याने किंग खानचे चाहते खूश आहेत. तर, काही नेटकऱ्यांनी जॉन सीनाचा डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत त्याचे कौतुक केले आहे.