Aaradhya Bachchan Angry On Paparazzi : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) केवळ तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी इंडस्ट्रीत ओळखली जात नाही तर तिच्याकडे एक जबाबदार आई म्हणूनही पाहिले जाते. ऐश्वर्या नेहमीच आपली मुलगी आराध्यासोबत (Aaradhya Bachchan) सावलीसारखी फिरताना दिसली आहे. लग्नकार्य असो, कार्यक्रम असो किंवा विमानतळावर, ती नेहमीच आराध्यासोबत दिसते. आराध्या आणि ऐश्वर्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच ऐश्वर्याची लाडकी लेक पापाराझींवर संतापली असल्याचे दिसून आले.
पॅप्सवर संतापली आराध्या...
ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच मुलगी आराध्यासोबत विमानतळावर दिसली. यावेळी आई आणि मुलगी दोघीही ब्लॅक कलर मॅचिंग आउटफिटमध्ये दिसल्या. या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या आणि आराध्या एअरपोर्टवर चेक इन करताना दिसत आहेत. त्याच दरम्यान तिथे असलेल्या पापाराझींनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याची धडपड सुरू केली. तेवढ्यात मागे एक पापाराझी ऐश्वर्या आणि आराध्याला आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होता आणि त्यांच्या मोबाईलमधून एक विचित्र आवाज आला. हे पाहून आराध्याला त्याच्यावर रागवते. यानंतर आराध्या तिची आई ऐश्वर्यासोबत आत जाते आणि निघताना तिने पापाराझींना खूप प्रेमाने निरोप देताना दिसते.
व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स...
आराध्या बच्चनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेक वापरकर्ते आराध्याच्या प्रोटेक्टिव्ह स्वभावाचे कौतुक करत आहे. तर अनेकजण तिची आजी जया बच्चन यांच्याशी तुलना करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'जयाचा आत्मा तिच्यात आला आहे.' दुसरा युजर लिहितो, 'ही आपली आजी जयावर गेली आहे का?' एकाने लिहिले, 'अभिषेक इथेही तुझ्यासोबत का नाही?' अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर आहेत.