Marathi Serial : मराठी मालिकांचा आफ्रिकेत बोलबाला, पण 'तू तेव्हा तशी'चं डबिंग पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर; म्हणाले, 'आफ्रिकेच्या बायकांनाही...'
Marathi Serial : झी मराठीवरील तू तेव्हा तशी ही मालिका आता दक्षिण आफ्रिकेतही प्रदर्शित करण्यात येते.
Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) आणि प्रेक्षक वर्ग हे नातं फार जुनं आहे. आभाळमायापासून सुरु झालेला झी मराठी (Zee Marathi) प्रवास तर आता एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहचला आहे. ती मालिका, त्यातली पात्र ही प्रेक्षकांना आपल्या घरातलीच वाटतात. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या मराठी प्रेक्षकांसाठी देखील मराठी मालिका हा फार जिव्हाळ्याचा विषय असतो. पण आता ह्याच मालिकाही सातासमुद्रापार पोहचल्या असून तिथल्या प्रेक्षकांचंही मनोजरंजन त्यांच्या कळणाऱ्या भाषेत केलं जातंय.
झी मराठी वाहिनीवरील स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची तू तेव्हा तशी ही मालिका सध्या आफ्रिकेतील प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. झी वन आफ्रिका या वाहिनीवर ही मालिका Never Too late For Love या नावाने प्रदर्शित केली जातेय. या मालिकेचं इंग्रजीत डबिंग करण्यात आलं आहे. त्यामुळे आता मराठी मालिकांचा आफ्रिकेतही बोलबाला असल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय वेळेनुसार दररोज संध्याकाळी 6 वाजता ही मालिका प्रदर्शित केली जातेय.
प्रोमोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्यावर युजर्सनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एकानं म्हटलं की, आफ्रिकेच्या बायकांना लागला झी मराठीचा नाद, तर दुसर्याने म्हटलं की, आता आम्ही काहीही हां श्री याची वाट पाहत आहोत. एकाने तर म्हटलं की, आफ्रिकेचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.
View this post on Instagram
तु तेव्हा तशी मालिकेबद्दल
पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं, जे कधीही विसरता येत नाही. आयुष्यभरासाठी त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर.....? अशीच काहीशी गोष्ट या मालिकेची होती. या मालिकेच शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी हे मुख्य भूमिकेत होते. ‘चाळीशी पार केलेल्या सौरभ–अनामिकाची फ्रेश आणि युथफूल अशी ही प्रेमकहाणी होती.