एक्स्प्लोर

'बिग बॉस'मधून बाहेर पडताच उषा नाडकर्णींनी अनेकांना शिव्यांनी धुतलं

उषा नाडकर्णी तब्बल 11 आठवड्यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या. या अकरा आठवड्यांचा अनुभव त्यांनी ‘एबीपी माझा’सोबत शेअर केला.

मुंबई: अभिनेत्री उषा नाडकर्णी तब्बल 11 आठवड्यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या. या अकरा आठवड्यांचा अनुभव त्यांनी ‘एबीपी माझा’सोबत शेअर केला. बिग बॉसचा पाहुणचार कसा वाटला? तो पाहुणचार नव्हता. मी तिथे स्वयंपाकीण होते. मजा आली. सगळं सहन करत, एक वेगळं जीवन जगून आले. तुमच्या प्रवासाचं मोजमाप कसं कराल? आपल्याही घरात भांडणं होतात. बिग बॉसचं घरही मी आपलं मानलं. तिथे मी मोजक्याच लोकांना ओळखत होते. नंदकिशोर आल्यावर त्याला खूप चरबी होती. वाईल्ड कार्ड एण्ट्रीनंतर त्याने दिखावेगिरी केली. त्याला फळ मिळालं, त्याच्या डोक्यावर अंडी फुटली, पीठ टाकलं, मला आनंद झाला. एखादा माणूस एव्हढं बोलतोय, तुम्हाला बोलावंस वाटलं नाही? सुरुवातीला मी त्याला समजावलं.  त्याला सांगितलं, तू इतका बोलतोयस, तू असं नको समजू मी गांX आहे. मी गांX नाहीय. मी तो शब्द वापरला. इतकं बरं नाही. तुझी माझी दोस्ती नाही,  तुझी माझी वयाची बरोबरी नाही. मग भूषणही तसंच करायला लागला. त्यावेळी मी भूषणला म्हटलं तुझ्या आईला तू असंच चिडवत होतास? तरी तो माझी पाठ सोडतच नव्हता. संध्याकाळी नंदकिशोर बिस्किट मागत होता तेव्हा मी तोंड न बघता त्याला बिस्किट दिलं. नंदकिशोरचं वागणं दुसऱ्या दिवशीही सुरुच होतं. मी भूषणला सांगितलं त्याला थांबव. पण शेवटी एखाद्याने ठरवलेलंच असलं, आपण त्याला छळायचं, तर आपण त्याला न थकता काय करतोय ते बघायचं. नंदकिशोर म्हणाला, तू म्हातारी आहेस म्हणून नायतर...... तेव्हा पुष्कर म्हणाला नायतर काय? मी पुष्करला थांबवलं. हा वाईल्ड कार्ड एण्ट्रीवाला माणूस मारामारी करु शकेल, म्हणून मी पुष्करला बाजूला सारलं. बाकी ठिकाणच्या बिग बॉस मध्ये होतं, तसं मराठीत होऊ नये असं मला मनापासून वाटत होतं. मला शिव्या देता येत नव्हत्या? पण मला दाखवायचं नव्हतं. मी सहनशील झाले होते. मला ज्यांनी ज्यांनी छळलं, त्यांना त्यांना देवाने शिक्षा दिली. देवाचं माझ्याकडे लक्ष आहे. मी देवाला कधीही फाXXवर मारलं नाही. आणखी एक माणूस पहिल्या दिवसापासून तुमच्या मागे होता..त्या माणसाबद्दल काय वाटतं? अनिल थत्ते नादान, चक्रम, येडछाप माणूस होता. तो येडXX माणूस होता.  मी त्याला ओळखत नव्हते, हा कोण माणूस मला माहित नव्हतं. केस रंगवून, टिकल्या लावून कोण आलंय असा मी विचार करत होते.  मी कुणालाही मुलाखत दिली नव्हती की मी वयाने मोठी आहे. मला दोन पेपरमधून फोन आला होता तेव्हा मी जातेय असं सांगितलं होतं. पण हा माणूस मी मोठी आहे असं म्हणाल्याचं का म्हणतोय? त्याने आल्यापासून मला पिडलं. पण मी रिअॅक्ट झाले नाही. तुमचा हाच आवेश बिग बॉसच्या घरात का दिसला नाही? बाहेर आल्याने मी आझाद पंछी आहे. मला खुशी आहे. आतमध्ये बसून बसून मी त्याच्यावरच विचार करत होते. मला माहित नसताना या लोकांनी मला नॉमिनेट केल्याचा मला त्रास झाला. माझं बीपी हाय झालं. म्हणून मी आतून त्रास करुन घेणं टाळलं. कोण जिंकेल? कोण जिंकायला हवं? कोण जिंकेल हे काय सांगता येत नाही. कोणीही जिंकू शकेल. तुमचा लाडका स्पर्धक कोण? मला पुष्करबद्दल वाटत होतं, मेघाही आवडती आहे. रेशम आणि मेघामध्ये टशन आहे. घरात काय चित्र असतं? घरात भांडणं हमरीतुमरी झालेली नाही. एकत्र राहून तीच तीच तोंडं रोज बघून मी बधीर झाले होते. कंटाळले होते. बाहेर आल्यानंतर मला बरं वाटलं. स्टेजवरुन उतरल्यानंतर मी अक्षरश: ओरडले. कोण बाहेर गेल्यावर वाईट वाटलं? आरती सोळंकी बाहेर गेल्यानंतर मला खूप वाईट वाटलं.  ती राहायला हवी होती. तिला पण या लोकांनी गेम करुन बाहेर काढलं. आता मी तिला फोन करणार आहे. आम्ही भेटू बाहेर आल्यानंतर पहिलं काम काय केलं? बाहेर आल्यावर भावाला फोन केला. माझ्या घराची चावी त्याच्याकडे असते. रात्री चारपर्यंत मी गप्पा मारत होते. कोण कोण काय काय बोलले हे त्याला सांगितलं. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Ajay Devgn Reaction On Tukaram Mundhe: कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: 14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget