एक्स्प्लोर
टीव्ही अभिनेत्री संजिदा शेखविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
22 वर्षीय झाकेरबानू झाकीर हुसैन बागबान हिने पती अनस अब्दुल रहीम शेख, नणंद संजिदा शेख आणि सासू अनिशा शेख यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

मुंबई : क्या होगा निम्मो का, नच बलिए, लव्ह का है इंतजार यासारख्या टीव्ही मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री संजिदा शेख अडचणीत येण्याची शक्यता आहे. संजिदाच्या वहिनीने पतीसह नणंद (संजिदा) आणि सासूविरोधात घरगुती अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. 22 वर्षीय झाकेरबानू झाकीर हुसैन बागबान हिने पती अनस अब्दुल रहीम शेख, नणंद संजिदा शेख आणि सासू अनिशा शेख यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. 27 मे रोजी वडिलांशी फोनवर बोलत असताना तिघांनी आरडाओरड करुन आपल्याला मारहाण केल्याचा दावा तिने तक्रारीत केला आहे. 'मी त्यांना घरात नकोशी झाल्यामुळे मी मुंबई सोडून अहमदाबादला माहेर गाठलं. त्यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. 29 तारखेला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिस स्थानकात एफआयआर दाखल केला' असं संजिदाच्या वहिनीने सांगितलं. 'माझा नवरा दारु आणि ड्रग्जच्या आहारी गेला आहे. मॅच फिक्सिंगमध्येही त्याचा सहभाग आहे. सासरी कायम वडिलांकडून पैसे आणण्यासाठी माझ्या मागे लागायचे आणि मारहाण करायचे' असंही झाकिरा म्हणाली. त्यानंतर संजिदाने झाकिराविरोधात याचिका दाखल केली आहे. झाकिराचे तिच्या वडिलांशी असलेले नातेसंबंध बिघडल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या भावासोबतच्या नात्यावर झाल्याचं संजिदाने म्हटलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक
ठाणे






















