एक्स्प्लोर
Advertisement
'होणार सून' फेम अभिनेता शशांक केतकरचा साखरपुडा
मुंबई : 'होणार सून मी ह्या घरची' फेम टीव्ही अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. नुकताच शशांकचा साखरपुडा पार पडला.
प्रियंका ढवळे नामक तरुणीशी शशांक लगीनगाठ बांधणार आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामवर दोघांच्या साखरपुड्याचा फोटो पोस्ट करुन बातमी जाहीर केली आहे. प्रियंका वकील असल्याची माहिती आहे. यापूर्वी शशांकने फेसबुकवर दोघांचे एकत्र फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा रंगल्या होत्या.
स्वप्नांच्या पलिकडले, होणार सून मी ह्या घरची, इथेच टाका तंबू यासारख्या मालिकांतून शशांकचा चेहरा घराघरात पोहचला होता. त्याचप्रमाणे शशांकचं 'गोष्ट तशी गमतीची' हे नाटक महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांची वाहवा मिळवत होतं. त्याने 'वन वे तिकीट' या चित्रपटातही भूमिका साकारली होती.
दोन वर्षांपूर्वी शशांक केतकरचं 'होणार सून..' मालिकेतील त्याची सहकलाकार तेजश्री प्रधानशी लग्न झालं होतं. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत दोघं विभक्त झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
बातम्या
Advertisement