Tuzech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत उर्मिला कोठारीची पुन्हा एन्ट्री; साकारणार मंजुळा सातारकरची भूमिका
Urmilla Kothare : 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत आता अभिनेत्री उर्मिला कोठारे एन्ट्री होणार आहे.
Tuzech Mi Geet Gaat Aahe Marathi Serial Urmilla Kothare : 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet gaat Aahe) या मालिकेत आता स्वराज आणि मल्हारचं नातं निर्णायक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आता या मालिकेच्या आगामी भागात अभिनेत्री उर्मिला कोठारेची (Urmilla Kothare) एन्ट्री होणार आहे.
मल्हारच आपले वडील आहेत ही गोष्ट स्वराजला कळली आहे. इतकी वर्ष वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या स्वराज म्हणजेच स्वराच्या आयुष्यातला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. मल्हारला ही गोष्ट स्वराज सांगू इच्छित असला तरी नियतीच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी आहे. मल्हारला बाबा अशी हाक मारण्याचा क्षण आयुष्यात येण्यापूर्वीच स्वराजने अपघातात त्याचा आवाज गमावला आहे.
उर्मिला कोठारीची एन्ट्री (Urmilla Kothare Entry Marathi Serial)
स्वराज त्याच्या मनातली भावना कशी व्यक्त करणार हे मालिकेतील पुढील भागांमधून उलगडेल. स्वराज आणि मल्हारच्या नात्यात हे भावनिक चढउतार सुरू असतानाच मालिकेत उर्मिला कोठारेची एन्ट्री होणार आहे. उर्मिलाने मालिकेत स्वराच्या आईचं म्हणजेच वैदेही हे पात्र साकारलं होतं.
मंजुळा सातारकरच्या भूमिकेत दिसणार उर्मिला कोठारे
मालिकेत वैदेहीचं गंभीर आजारामुळे निधन दाखवण्यात आलं असलं तरी स्वराच्या आठवणींमधून उर्मिलाचं दर्शन प्रेक्षकांना होत राहिलं. आता उर्मिला या मालिकेत एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंजुळा सातारकर असं तिच्या भूमिकेचं नाव असून तिच्या येण्याने मालिकेत नवं वळण येणार आहे. याआधी उर्मिलाला प्रेक्षकांनी ग्लॅमरस रुपात रुपेरी पडद्यावर पाहिलं आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेतला तिचा अंदाज आजवर तिने साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा आणि हटके आहे.
View this post on Instagram
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतील नव्या भूमिकेबद्दल उर्मिला म्हणाली,"तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत मी वैदेहीची भूमिका साकारली होती. वैदेही या पात्राच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेचा लहेजा शिकायला मिळाला. आता मंजुळा सातारकर ही नवी व्यक्तिरेखा साकारणार आहे. मंजुळा ही साताऱ्याची असून त्या भाषेचाही वेगळाच गोडवा आहे. मंजुळा हे पात्र वैदेही सारखं दिसणारं आहे. तिच्या येण्याने स्वराज आणि मल्हारच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे.
संबंधित बातम्या