Tula Shikvin Changlach Dhada : चारुलता की भुवनेश्वरी? अधिपतीची जन्मदात्री आणि अक्षराची भेट; मालिकेला पुन्हा नवं वळण
Tula Shikvin Changlach Dhada : तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. त्यातच आता अधिपतीची जन्मदात्री आणि अक्षराशी भेट होणार आहे.
![Tula Shikvin Changlach Dhada : चारुलता की भुवनेश्वरी? अधिपतीची जन्मदात्री आणि अक्षराची भेट; मालिकेला पुन्हा नवं वळण Tula Shikvin Changlach Dhada Marathi Serial Update Zee Marathi Serial Television News in Marathi Tula Shikvin Changlach Dhada : चारुलता की भुवनेश्वरी? अधिपतीची जन्मदात्री आणि अक्षराची भेट; मालिकेला पुन्हा नवं वळण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/07/27d2b4a575c8beed226f0cdd95b94aef1723040773188720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tula Shikvin Changlach Dhada : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यातच मालिकेत सात्यत्याने येणारं रंजक वळणामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता पुन्हा एकदा या मालिकेने रंजक वळण घेतलं आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अधिपतीची जन्मदात्री आणि अक्षराची भेट होणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे. पण ही नक्की चारुलताच आहे की भुवनेश्वरी या प्रश्नाच्या उत्तरासाठी मात्र प्रेक्षकांना काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचं पाहायला मिळतंय.
मालिकेचा नवा प्रोमो
मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अक्षरा बाजारात जाते तेव्हा कुणीतरी ओळखीचं दिसतं. म्हणून ती त्या व्यक्तीचा पाठलाग करत असते. तसेच ती व्यक्ती भुवनेश्वरी तर नाही ना अशी शंका तिला येते. त्याची खात्री करुन घेण्यासाठी ती मागे मागेही जाते. ती व्यक्ती जेव्हा समोर येते तेव्हा अक्षरा म्हणते की, भुवनेश्वरी मॅडम इतके दिवस तुम्ही कुठे होतात? चला आपण घरी जाऊयात. त्यावर ती व्यक्ती म्हणते की, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी भुवनेश्वरी मॅडम नाही. मी चारुलता. त्यामुळे आता अधिपतीची जन्मदात्री चारुलता आता कोणतं नवं वळण घेऊन येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
View this post on Instagram
अक्षरा अधिपतीच्या संसाराला आतच सुरुवात झाली होती. पण पुन्हा एकदा भुवनेश्वरीमुळे त्यांच्या संसारात वादळ निर्माण झालं. पण आता चारुलताच्या येण्याने कोणतं नवं संकट येणार की जुनंच संकट नव्याने उभं ठाकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तसेच ही चारुलता आहे की भुवनेश्वरी याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)