Tula Shikvin Changlach Dhada : अधिपती आणि अक्षराच्या संसाराला सुरुवात होणार ;'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेचा रंगणार जेजुरी विशेष भाग
Tula Shikvin Changlach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत आता अधिपती आणि अक्षराच्या संसाराला सुरुवात होणार आहे.
Tula Shikvin Changlach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह प्रेक्षकांनी अनुभवला. दोघांच्या लग्नामध्ये आणि लग्नानंतर अनेक अडचणी येताना दिसत आहेत. अशातच अक्षरा अधिपती दोघं जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जाणार आहेत.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेचा रंगणार जेजुरी विशेष भाग
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेच्या नवीन भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर आऊट झाला. त्यामध्ये अधिपती अक्षराला उचलून घेत जेजुरीचा गड चढताना दिसत आहे. या मालिकेच्या शूटिंगसाठी हे कलाकार खरोखरच जेजुरीला गेले होते. तेथील खंडोबाच्या देवळातील एक फोटो शिवानीने शेअर केला. त्या फोटोमध्ये शिवानी पारंपारिक वेशभूषेत दिसत असून तिने कपाळावर भंडारा लावला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “येळकोट येळकोट जय मल्हार!". 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा जेजुरी विशेष भाग प्रेक्षकांना 18 ऑक्टोबरला रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे.
तगडी स्टारकास्ट असलेली मालिका
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचं स्टारकास्ट खूपच तगडं आहे. हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तर कविता लाड-मेढेकर आणि विजय गोखले मध्यवर्ती भूमिकेत आहेत. मधुगंधा कुलकर्णी यांनी या मालिकेचं लेखन केलं असून शर्मिष्ठा राऊतने या मालिकेची निर्मिती केली आहे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेबद्दल जाणून घ्या...
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेची कथा खूपच रंजक आहे. ही मालिका आहे एका शिक्षिकेची म्हणजेच अक्षराची जी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, आणि अधिपतीची जो कमी शिकलेला पण गर्भ श्रीमंत आहे. अक्षरा सुंदर, सुशिक्षित, गुणी आणि तत्वनिष्ठ मुलगी आहे तिची शिक्षणाविषयी ठाम भूमिका आहे, शिक्षण फक्त प्रगती करत नाही तर चरित्र घडवत. तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करत असं तीच म्हणणं आहे, म्हणून तिने शिक्षण क्षेत्र स्विकारलं.
दुसरीकडे मालिकेचा नायक अधिपतीचे अनेक व्यवसाय आहेत, त्याच्या मालकीची एक शाळा देखील आहे. पण त्याने नववीनंतर शिक्षण सोडलं कारण त्याच्या आईच म्हणणं आहे की शिक्षणाने कुणाचं भलं होत नाही, शिक्षण हे गरिबांसाठी असत त्यामुळे त्यांना नोकरी लागते, अधिपतीसाठी शिक्षण कधीही त्याच्या आड आलं नाही कारण त्याने अनेक व्यवसाय यशस्वीपणे केले आहेत. अधिपतीच आईवर खूप प्रेम आहे, अधिपती अक्षराच्या प्रेमात पडला पण मनातून खुश नसूनही आईने त्या दोंघाच लग्न लावून दिलं आहे.
संबंधित बातम्या