एक्स्प्लोर

Tu Hi Re Maza Mitwa : प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव अन् ईश्वरीची हटके लव्हस्टोरी, 'तू ही रे माझा मितवा'

Tu Hi Re Maza Mitwa : 'तू ही रे माझा मितवा' ही नवी मालिका 23 डिसेंबरपासून स्टार प्रवाहवर रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tu Hi Re Maza Mitwa : स्टार प्रवाहवर 'तू ही रे माझा मितवा' ही नवी मालिका सुरु होत आहे. अभिनेत्री शर्वरी जोग या मालिकेत ईश्वरी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेत तिने साकारलेल्या गुंजा या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. तू ही रे माझा मितवा मालिकेतल्या ईश्वरी या भूमिकेविषयी शर्वरीने काही खास गोष्टी सांगितल्या. 

या मालिकेचं काय वेगळेपण आहे?

शर्वरीने नव्या मालिकेबद्दल सांगताना स्टार प्रवाहसोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळतेय याचा आनंद व्यक्त केला. याआधी शर्वरी 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेत दिसली होती. त्या मालिकेसाठीही प्रेक्षकांनी तिला भरपूर प्रेम दिलं. आता ती ईश्वरीच्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

एक अनोखी लव्हस्टोरी

'तू ही रे माझा मितवा' मालिकेत एक अनोखी लव्हस्टोरी पाहायला मिळेल. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या प्रेमात आहेत, पण ते एकमेकांचा तितकाच तिरस्कारही करतात. एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत रहाताही येत नाही, अशी यांची प्रेमकहाणी आहे. थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे तू ही रे माझा मितवा ही मालिका. मला खात्री आहे प्रेक्षकांना ही हटके लव्हस्टोरी नक्की आवडेल.   

या मालिकेतल्या ईश्वरीच्या पात्राविषयी...

ईश्वरी एक अत्यंत मनस्वी आणि निरागस मुलगी आहे. ती जे काही करते ते मनापासून आणि जीव ओतून. तिचा देवावर खूप विश्वास आहे. श्रद्धेने एखादी गोष्ट मागितली तर ती मिळते अशी तिची धारणा आहे. ती बुजरी, साधी मुलगी असली तरी तिने एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्णत्वाला नेतेच. कोणतीही गोष्ट साध्य झाल्याशिवाय ईश्वरी प्रयत्न करणं सोडत नाही. ईश्वरीच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं. ती खूप स्वप्नाळू आहे. सिनेमे बघायला तिला खूप आवडतात. ती शाहरुखची फॅन आहे. त्याचे सिनेमे बघण्यासाठी ती काय वाट्टेल ते करायला तयार असते. तिला असं वाटतं की प्रत्येक नवरा बायकोचं नातं हे शाहरुख आणि त्याच्या सिनेमातल्या हिरॉईनसारखंच असतं. "माझ्या स्वभावाच्या पूर्ण वेगळं असं हे पात्र आहे त्यामुळे काम करताना खूप मज्जा येतेय", असं यावेळी शर्वरीने सांगितलं.  

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

शर्वरी तू मुळची कोल्हापुरची पण मालिकेच्या निमित्ताने तिने नवनव्या भाषा आत्मसात केल्या आहेत. याबद्दल सांगताना शर्वरी म्हणाली, "स्टार प्रवाहच्या 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेच्या निमित्ताने मी आदिवासी भाषा शिकले. त्या भाषेचा वेगळा गोडवा होता. आता 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत मी इंदौरची भाषा आत्मसात करतेय. नुकतंच आम्ही इंदौरमध्ये शूटिंगही केलं. तिथल्या लोकांसोबत संवाद साधत मी नवनवे शब्द शिकलेय. आमचे निर्माते महेश तागडे देखिल मुळचे इंदौरचे आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याकडूनही शिकतेय". 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्टABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 18 February 2024Disha Salian Aditya Thackeray Majha Mudda EP 4 : वकिलाचे दावे ते ठाकरेंवर आरोप; काय आहे प्रकरण?Aaditya Thackeray Chandrashekhar Bawankule Meet : आदित्य ठाकरे-बावनकुळे यांची विधान भवनात भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget