TRP Report : टीआरपीमध्ये 'तारक मेहता'ची मुसंडी, 'अनुपमा'ला पहिल्या नंबरवर पोहोचायला वाट पाहवी लागणार
TRP Report This Week : टीआरपीच्या शर्यतीत तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेने मुसंडी मारली आहे.

TRP Report This Week : छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतात. टीआरपीच्या शर्यतीत अनुपमाला पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या आठवड्यात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने सरप्राईज एन्ट्री घेतली आहे. 'तारक मेहता'ने टीआरपीमध्ये मुसंडी मारली आहे.
टीआरपीमध्ये 'तारक मेहता'ची सरप्राईज एन्ट्री
रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा' टीव्ही शोने भरभरुन मनोरंजन करत प्रेक्षकांची वाहवाह मिळवली. टीआरपीमध्ये 'अनुपमा'ने बराच काळ पहिल्या क्रमांकावर अधिराज्य गाजवलं. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी, 'अनुपमा' शोच्या टीआरपीमध्ये मोठी घट झाली. हा शो आता चौथ्या क्रमांकावर घसरली आहे आणि तेव्हापासून, 'अनुपमा'ला पहिल्या क्रमांकाची गादी परत मिळवता आलेली नाही. टीआरपीमध्ये पहिलं स्थान परत मिळविण्यासाठी 'अनुपमा' सध्या संघर्ष करताना दिसत आहे.
'अनुपमा' टीआरपीमध्ये खाली घसरली
आता नवीन वर्ष 2025 मध्ये अनुपमा टीआरपीमध्ये खाली घसरली असून इतर मालिकांनी ते स्थान काबीज केलं आहे. 2025 च्या दुसऱ्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टीआरपीच्या यादीत पहिल्या पाच टीव्ही शोमध्ये अनुपमा, ये रिश्ता क्या कहलाता है, उडने की आशा या मालिकांचा समावेश आहे. पण पहिल्या टीआरपीच्या टॉप 5 मध्ये एक सरप्राईज एन्ट्री झाली आहे.
तारक मेहता का उलटा चष्मा
'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोने या आठवड्यात टीआरपी रेटींगमध्ये सरप्राईज एन्ट्री घेतली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या टीआरपीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि टीआरपीमध्ये तिसरं स्थान मिळवलं आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'घुम है किसीके प्यार में' या शोंना मागे टाकलं आहे. या आठवड्यात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेला टीआरपी रेटिंगमध्ये 2.3 दशलक्ष इम्प्रेशन मिळाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
