एक्स्प्लोर
आवडीची टीव्ही चॅनल्स निवडण्यासाठी 'ट्राय'कडून पुन्हा मुदतवाढ, ग्राहकांसाठी 'ही' नवीन डेडलाईन
यापूर्वी दिलेली मुदतवाढ 31 जानेवारीलाच संपली होती. मात्र 17 कोटींपैकी 9 कोटी ग्राहकांनीच नवीन प्लान सुरु केला आहे. केबल सेवा वापरणाऱ्या साडेसहा कोटी, तर डीटीएच वापरणाऱ्या अडीच कोटी ग्राहकांनी आवडत्या चॅनल्सची निवड केली आहे.
मुंबई : आवडीच्या टीव्ही वाहिन्या निवडण्याचं स्वातंत्र्य देण्यासाठी 'टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया' (ट्राय) कडून पुन्हा ग्राहकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 मार्च ही नवीन डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे.
यापूर्वी दिलेली मुदतवाढ 31 जानेवारीलाच संपली होती. मात्र 17 कोटींपैकी 9 कोटी ग्राहकांनीच नवीन प्लान सुरु केला आहे. केबल सेवा वापरणाऱ्या साडेसहा कोटी, तर डीटीएच वापरणाऱ्या अडीच कोटी ग्राहकांनी आवडत्या चॅनल्सची निवड केली आहे.
नव्या नियमांनुसार आपल्या आवडीची टीव्ही चॅनेल्स कशी निवडावीत, याबाबत अनेक जणांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. त्यामुळे ट्रायने चॅनेल निवडण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सुरुवातीला 29 डिसेंबर 2018 पर्यंत असलेली मुदत एक महिन्याने वाढवण्यात आली होती. 31 जानेवारीपर्यंत दिलेली पहिली मुदतवाढ आता आणखी दोन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीची चॅनल्स निवडण्यासाठी आणखी अवधी मिळणार आहे.
ट्रायच्या नव्या नियमानुसार ग्राहकांना जी चॅनल्स पाहायची आहेत, केवळ त्याचेच पैसे द्यावे लागणार आहेत. ग्राहकांच्या फायद्याची ही नवी नियमावली लागू करताना त्यांना आपल्या पसंतीचे चॅनल निवडण्यासाठी वेळ मिळावा यासाठी तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जातं. नव्या नियमांमुळे ग्राहकांचं टीव्ही पाहणं खूप स्वस्त होणार असल्याचं ट्रायचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement