Irsal : 'इथला भाय कोणचं नाय'; 'इर्सल'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
Irsal : 'इर्सल' सिनेमाचा उद्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.
Irsal Movie : 'इर्सल' (Irsal) हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (World Television Premiere) होणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना उद्या (रविवारी) दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता पाहायला मिळणार आहे.
निवडणुका आणि राजकारणातल्या साजूक मुखवट्या मागचं भयाण वास्तव दाखवणारा 'इर्सल' हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'इर्सल' या सिनेमाचं दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे आणि विश्वास सुतारने केलं आहे. ‘इर्सल’च्या माध्यमातून विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझेने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
View this post on Instagram
‘इर्सल’मध्ये दिसणार 'हे' कलाकार
‘इर्सल’ सिनेमात डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुजाता मोगल, अभिनेत्री माधुरी पवार, शरद जाधव, अजिंक्य निकम, विश्वास सुतार, संजय मोहिते, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, सुधीर फडतरे, ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, आकाश भिकुले, वैशाली घोरपडे, चैताली बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, हनिफ शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत.
'इलेक्शन म्हणजे समदा डाकू लोकांचा खेळ असतोय', 'इथला भाय कोणचं नाय', 'नाद केला ना तर बाद करीन' किंवा 'एकदा पाखरू उडालं ना की त्याचा नाद सोडून द्यायचा', तिकीट, पक्ष असल्या कुबड्या बांडगुळांनाचं लागतात' असे ‘इर्सल’ सिनेमातील संवाद प्रेक्षकांवर छाप सोडतात. 3 जून 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
संबंधित बातम्या