Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Sam Bahadur OTT Release Date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होणार 'सॅम बहादुर'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या


Sam Bahadur OTT Release Date: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सॅम बहादुर  या चित्रपटाची रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. तरी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटातील विकी कौशलचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. अशताच 'सॅम बहादुर' हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होत आहे. जाणून घेऊयात सॅम बहादुर या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Article 370: यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' मध्ये 'हा' मराठमोळा अभिनेता झळकणार; चित्रपटात दिसणार अॅक्शन मोडमध्ये


Article 370: अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) सध्या 'आर्टिकल 370' (Article 370) या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.  या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या टीझरला नेटकऱ्यांनी पसंती मिळाली.  'आर्टिकल 370'  या चित्रपटाच्या टीझरमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याची झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली. टीझरमध्ये हा मराठमोळा अभिनेता अॅक्शन मोडमध्ये दिसला. 'आर्टिकल 370' या चित्रपटात कोणत्या मराठमोळा अभिनेत्यानं भूमिका साकारली आहे? जाणून घेऊयात...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Emergency Release Date: "इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया"; कंगनानं खास व्हिडीओ शेअर करुन 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट केली जाहीर


Emergency Release Date: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या  'इमर्जन्सी' (Emergency) या आगामी चित्रपटात  इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी कंगनानं या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. आता कंगनानं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाचा "इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया" हा डायलॉग ऐकू येत आहे. तसेच चित्रपटात इमर्जन्सीच्या काळातील काही दृष्य देखील दाखवण्यात आले आहेत. कंगनानं हा व्हिडीओ शेअर करुन 'इमर्जन्सी' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


VIDEO: पॅरिसमधील कार्यक्रमासाठी अनन्यानं केलेल्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, 'दीदी, ही मच्छरदाणी...'


 Ananya Panday: बॉलिवूडमधील कलाकार हे त्यांच्या प्रोफेशनल लाईफशी संबंधित इतर काही गोष्टींमुळे चर्चेत असतात. हे कलाकार अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये रॅम्प वॉक करतात. त्यांच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशताच आता अभिनेत्री अनन्या पांडेच्या (Ananya Panday) एका कार्यक्रमातील रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील अनन्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Saif Ali Khan Surgery: सर्जरीनंतर सैफला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; अभिनेत्यानं चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट, म्हणाला, "जर ही सर्जरी वेळेवर झाली नसती तर..."


Saif Ali Khan Surgery:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)  याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल सैफच्या ट्रायसेपवर शस्त्रक्रिया झाली. सैफ हा त्याच्या आगामी 'देवारा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीन करत होता. यामुळे सैफच्या हाताला दुखापत झाली. मंगळवारी (23 जानेवारी) दुपारी सैफ अली खानला सर्जरीनंतर डिस्चार्ज देण्यात आला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सैफनं त्याच्या आरोग्याबाबत अपडेट दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा