Article 370: अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) सध्या 'आर्टिकल 370' (Article 370) या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.  या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या टीझरला नेटकऱ्यांनी पसंती मिळाली.  'आर्टिकल 370'  या चित्रपटाच्या टीझरमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याची झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली. टीझरमध्ये हा मराठमोळा अभिनेता अॅक्शन मोडमध्ये दिसला. 'आर्टिकल 370' या चित्रपटात कोणत्या मराठमोळा अभिनेत्यानं भूमिका साकारली आहे? जाणून घेऊयात...


'आर्टिकल 370' मध्ये वैभव तत्ववादी साकारणार भूमिका


2023 मध्ये सर्किट आणि कमांडो या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला वैभव तत्ववादी आता 2024 मध्ये यामी गौतमच्या आर्टिकल 370 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी वैभवनं बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे. 


आर्टिकल 370 या चित्रपटाबद्दल बोलताना वैभव म्हणाला, “आदित्य जांभळे दिग्दर्शित या विलक्षण चित्रपटाचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अप्रतिम कलाकारांसोबत काम केल्याने ते आणखी खास बनते. काश्मीरच्या नयनरम्य ठिकाणी शूटिंग करणे ही एक उत्तम गोष्ट होती. चित्रपटाच्या शूटिंगवेळी आम्ही सर्वांनी खूप मेहनत केली पण चित्रपट पाहिल्यानंतर मला वाटते की सर्व मेहनत सार्थकी लागली. "


पाहा 'आर्टिकल 370' चा टीझर:






आर्टिकल 370 या चित्रपटाचं शूटिंग काश्मीरमध्ये करण्यात आले होते आणि या चित्रपटाची कथा एका स्थानिक फील्ड एजंटभोवती फिरते जो एक गुप्त मिशनमध्ये आहे. आर्टिकल 370 या चित्रपटाचं  दिग्दर्शन सुहास जांभळे यांनी केले असून आदित्य धर, लोकेश धर आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपाटी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारीला  प्रदर्शित होत आहे.


आर्टिकल 370 ची स्टार कास्ट


आर्टिकल 370 या चित्रपटात प्रियामणी, अरुण गोविल, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार, इरावती हर्षे मायादेव हे कलाकार देखील महत्वाची भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षक आर्टिकल 370 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Article 370 Teaser : आर्टिकल 370 चा टीझर आऊट, दहशतवाद्यांचा खात्मा करताना दिसणार यामी गौतम