Shoaib Malik And Sana Javed: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. शोएबनं 20 जानेवारी 2024 रोजी अभिनेत्री सना जावेदसोबतचे (Sana Javed) लग्न केलं आहे. शोएबने त्याच्या आणि सनाच्या लग्नाची घोषणा केल्यानंतर अनेकांना धक्का बसला. शोएबनं सानिया मिर्झाला घटस्फोट दिला आहे, असं म्हटलं जात आहे. पण सानिया आणि शोएब यांनी त्यांच्या चाहत्यांना घटस्फोटाची माहिती दिलेली नाही. अशताच आता शोएब आणि सना यांच्या लग्नानंतर या दोघांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शोएब हा सनासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे.


एकमेकांना फ्लर्ट करताना दिसले शोएब आणि सना


शोएब मलिक आणि  सना जावेद यांचा 2021 मधील एका पाकिस्तानी रिअॅलिटी शोमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे जीतो या शोमध्ये एकमेकांसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. 


नेटकऱ्यांनी झापलं!


शोएब मलिक आणि सना जावेद यांच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन या दोघांना झापलं आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करुन सानिया मिर्झाला पाठिंबा दिला.  एका नेटकऱ्यानं व्हिडीओला कमेंट केली, "म्हणजे दोघांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होते. " तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "दोघेही धोकेबाज" 






क्रिकेटर शोएब मलिकने 2002 मध्ये आयशा सिद्दीकीशी लग्न केले, त्यानंतर 2010 मध्ये त्याने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत लग्न केले.  2018 मध्ये सानियाला मुलगा झाला. या मुलाचं नाव इजहान आहे. आता शोएबनं सनासोबत निकाह केला आहे. सनानं 2020 उमेर जसवालसोबत लग्न केलं होतं.


सना आणि शोएब यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये सना आणि शोएब हे खास लूकमध्ये दिसले.






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Sania Mirza : सानिया मिर्झा की शोएब मलिक? दोघांपैकी कोण सर्वाधिक मालामाल; 'खुला' झाल्याने संपत्तीची वाटणी कशी होणार?