Emergency Release Date: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या  'इमर्जन्सी' (Emergency) या आगामी चित्रपटात  इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी कंगनानं या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. आता कंगनानं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाचा "इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया" हा डायलॉग ऐकू येत आहे. तसेच चित्रपटात इमर्जन्सीच्या काळातील काही दृष्य देखील दाखवण्यात आले आहेत. कंगनानं हा व्हिडीओ शेअर करुन 'इमर्जन्सी' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.


कंगनानं शेअर केला व्हिडीओ


कंगनानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला  25 जून 1975 ही तारीख दिसते. त्यानंतर काही लोक दगडफेक करताना दिसतात. एका वर्तमानपत्रावर 'इमर्जन्सी जाहीर करण्यात आली आहे', अशी बातमी दिसते. त्यानंतर चित्रपटात जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर  हे तुरुंगात दिसतात. "सरकार राज नाही अहंकार राज है ये" हा अनुपम खेर यांचा डायलॉग व्हिडीओमध्ये ऐकू येतो.


'मुझे इस देश की रक्षा करने से कोई नहीं रोक सकता, क्यूंकी इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया' हा कंगनाचा डायलॉग व्हिडीओच्या शेवटी  ऐकू येतो. कंगनाच्या या डयलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.






कधी रिलीज होणार इमर्जन्सी?


कंगनानं एक पोस्ट शेअर करुन इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "भारतातील सर्वात डार्क  कथा अनलॉक करा. 14 जून 2024 रोजी इमर्जन्सी येत आहे." 14 जून रोजी कंगनाचा इमर्जन्सी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 






'इमर्जन्सी' ची स्टार कास्ट


इमर्जन्सी या चित्रपटात कंगना आणि  अनुपम खेर यांच्यासोबतच  श्रेयस तळपदे ,अशोक छाबरा, महिमा चौधरी, मिलिंद सोमण , विशाक नायर  आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Kangana Ranaut: 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट ढकलली पुढे; कंगना ट्वीट करत म्हणाली, "रिलीज डेट जाहीर केली होती पण..."