Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Musafiraa Trailer Out: पाच मित्रांची गोष्ट मांडणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Musafiraa Trailer Out:  पुष्कर जोग (Pushkar Jog) दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ (Musafiraa) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  रियुनियनच्या निमित्ताने भेटलेल्या पाच मित्रांच्या दुनियेची सफर या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. आयुष्यात आलेले, येणारे  चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटल की, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करणार आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार? हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतर कळणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tharla Tr Mg: माथेरानमध्ये पार पडलं 'ठरलं तर मग' मालिकेचं शूटिंग; अर्जुन आणि सायली यांच्या रोमँटिक अंदाजानं वेधलं लक्ष!


 स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिका दर आठवड्याला टीआरपीचे नवनवे उच्चांक गाठत आहे.मालिकेतील अर्जुन आणि सायलीमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. नुकतेच ठरलं तर मग या मालिकेचे शूटिंग माथेरान येथे पार पडलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Hansal Mehta: हंसल मेहता यांच्या 'गांधी' या वेब शोच्या शूटिंगला सुरुवात; 'हा' अभिनेता साकारणार महात्मा गांधींची भूमिका


Hansal Mehta: प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्या स्कॅम 2003, स्कॅम 1992 आणि स्कूप या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यांच्या आगामी वेब सीरिज आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच आता हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या नव्या वेब शोची माहिती दिली आहे. हा वेब शो महात्मा गांधी (Mahatma Gandhi)  यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. या वेब शोमध्ये अभिनेत्री अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) हा महात्मा गांधींची भूमिका साकारणार आहे.


 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Shivrayancha Chhava : छत्रपती संभाजी महाराजांवरील 'शिवरायांचा छावा' चित्रपटात धुळ्याच्या भूषणची प्रमुख भूमिका; 'या' दिग्गज कलाकारांचाही समावेश


Shivrayancha Chhava धुळे : गेल्या काही वर्षांपासून ऐतिहासिक विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट येत्या 16 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असणारे भूषण पाटील हे मूळचे धुळ्याचे रहिवासी आहेत.


 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Suniel Shetty: 'हर हर महादेव' सुनील शेट्टीनं लेकासोबत घेतलं महाकाल देवाचं दर्शन, म्हणाला, "मी पहिल्यांदाच आलो आणि..."


Suniel Shetty:  उज्जैन (Ujjain) येथील महाकालेश्वर (Mahakaleshwar) मंदिरात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स दर्शनासाठी जात असतात. गेल्या वर्षी क्रिकेटर के.एल. राहुलनं (KL Rahul) पत्नी अथिया शेट्टीसोबत (Athiya Shetty) महाकाल देवाचं दर्शन घेतलं. आता अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) यानं देखील महाकाल देवाचं दर्शन घेतलं आहे. तसेच सुनील हा भस्म आरती  सुनील शेट्टीनं मुलगा अहान शेट्टीसोबत महाकाल देवाचं दर्शन घेतलं. यावेळी दोघांनीही भगवान महाकालचे आशीर्वाद घेतले आणि भस्म आरतीमध्येही ते सहभागी झाले.  


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा