Tharla Tr Mg: माथेरानमध्ये पार पडलं 'ठरलं तर मग' मालिकेचं शूटिंग; अर्जुन आणि सायली यांच्या रोमँटिक अंदाजानं वेधलं लक्ष!
स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिका दर आठवड्याला टीआरपीचे नवनवे उच्चांक गाठत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठरलं तर मग या महाराष्ट्राच्या नंबर वन मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.
मालिकेतील अर्जुन आणि सायलीमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे.
अशताच नुकतेच ठरलं तर मग या मालिकेचे शूटिंग माथेरान येथे पार पडलं आहे.
माथेरानमधील ठरलं तर मालिकेच्या शूटिंगच्या फोटोंमध्ये सायली आणि अर्जुन यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे.
माथेरानमधील फोटोंध्ये सायली ही पिंक कलरचा ड्रेस आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे तर अर्जुन हा पिंक शर्ट आणि डोक्यावर हॅट अशा हटके लूकमध्ये दिसत आहे.
आता माथेरानमध्ये फिरायला गेलेल्या अर्जुन आणि सायलीचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेत बघायला मिळणार आहे.
आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर यांनी ठरलं तर मग या मालिकेची निर्माती केली आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोड्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.