Hansal Mehta: प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्या स्कॅम 2003, स्कॅम 1992 आणि स्कूप या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यांच्या आगामी वेब सीरिज आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच आता हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या नव्या वेब शोची माहिती दिली आहे. हा वेब शो महात्मा गांधी (Mahatma Gandhi)  यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. या वेब शोमध्ये अभिनेत्री अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) हा महात्मा गांधींची भूमिका साकारणार आहे.


वेब शोच्या शूटिंगला सुरुवात


हंसल मेहता यांनी क्लॅप बोर्डचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याच्यावर 'गांधी' असं लिहिलं दिसत आहे. तसेच त्यांनी गांधी या वेब शोच्या सेटवरील फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंना त्यांनी कॅप्शन दिलं,"इतिहास कॅप्चर करताना. गांधी वेब शोचे शूटिंग सुरू झाले आहे." हंसल मेहता यांनी शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.






हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "मी उत्सुकतेने वाट बघत आहेत." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "गांधी हा गांधींची भूमिका साकारणार आहे."


प्रतीक गांधी आणि हंसल मेहता यांनी यापूर्वीही एकत्र काम केले आहे. प्रतिक गांधी आणि हंसल मेहता यांच्या स्कॅम 1992 या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या वेब सीरिजमुळे प्रतीकची लोकप्रियता खूप वाढली होती.


हंसल मेहता यांची 'स्कूप' ही वेब सीरिज  गेल्या वर्षी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. पत्रकार जिग्ना वोरा यांच्या  'बिहाइंड द बार्स इन भायखळा: माय डेज इन प्रिझन' या पुस्तकावर ही वेब सीरिज आधारित आहे. अभिनेत्री करिश्मा तन्नानं 'स्कूप' या वेब सीरिजमध्ये जिग्ना वोरा यांची भूमिका साकारली होती.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Web Series On Mahatma Gandhi : प्रतीक गांधी साकारणार महात्मा गांधींची भूमिका; हंसल मेहतांनी शेअर केली खास पोस्ट