Shark Tank India: छोट्या पडद्यावरील शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या कार्यक्रमाचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. या दोन्हीही सीझन्सला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. आता लवकरच या कार्यक्रमाचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सीझनमध्ये कार्यक्रमातील काही जुने परीक्षकांसोबतच नवीन परीक्षक देखील दिसणार आहेत. या शोची जबरदस्त चर्चा आहे. नुकताच शार्क टँक सीझन-3 चा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये या सीझनच्या पहिल्या एपिसोडची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.


'शार्क टँक इंडिया-3' 22 जानेवारीपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Shark Tank India-3)


शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाचा तिसरा सीझन 22 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता प्रसारित होणार आहे. प्रेक्षक हा शो सोनी टीव्हीवर पाहू शकतात. Sony Liv या अॅपवर देखील प्रेक्षक हा शो पाहू शकता. 






6 नाही तर 12 परीक्षक असणार


शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीझनमध्ये  सहा नाही तर 12 परीक्षक असणार आहेत. अझहर इक्बाल, दीपंदर गोयल, वरुण दुआ, रॉनी स्क्रूवाला, राधिका गुप्ता आणि रितेश अग्रवाल , अमन गुप्ता, अमित जैन, नमिता थापर, अनुपमा मित्तल, पियुष बन्सल, विनीता सिंह हे उद्योजक या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


जाणून घ्या शोमधील परीक्षकांबद्दल...


शार्क टँक इंडिया-3 या शोमधील परीक्षक वरुण दुआ हे ACKO जनरल इन्शुरन्स कंपनीचे CEO आहेत. तर अझहर इक्बाल हे InShorts चे सह-संस्थापक आणि CEO आहेत. दीपंदर गोयल हे झोमॅटो या कंपनीचे संस्थापक आणि CEO आहेत. तसेच रॉनी स्क्रूवाला हे चित्रपट निर्माते आहेत. तर रितेश अग्रवाल हे Oyo Rooms चे संस्थापक आणि CEO आहेत. राधिका गुप्ता एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या MD आणि CEO आहेत.


अमन गुप्ता, अमित जैन,नमिता थापर,अनुपम गुप्ता,पीयूष बन्सल आणि विनीता सिंग यांनी याआधी शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाचे परीक्षण केलं आहे.  


जाणून घ्या शार्क टँक इंडिया या शोबद्दल...


'शार्क टँक इंडिया' या शोमध्ये  व्यवसाय करणारे लोक येतात.  हे लोक शोमधील परीक्षकांना त्यांची बिझनेस आयडिया आणि त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीबद्दल सांगतात. जर या बिझनेस आयडिया परीक्षकांना आवडल्या तर परीक्षक त्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करतात. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Shark Tank India-2: 10 वी पर्यंत शिक्षण अन् वयाच्या 8 व्या वर्षी झाला उद्योजक; 18 वर्षाच्या तरुणाचा प्रवास ऐकून 'शार्क्स' देखील झाले थक्क!