Divyanka Tripathi : टेलिव्हिजनची सुसंस्कृत सून दिव्यांका त्रिपाठीचा दबंग अंदाज; बायकर लूक पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पाहा फोटो
Divyanka Tripathi : टेलिव्हिजनची सुसंस्कृत सून दिव्यांका त्रिपाठीची बाईकर स्टाईल पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसतायत.
Divyanka Tripathi : छोट्या पडद्यावर सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारणारी टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) खऱ्या आयुष्यात फार वेगळी आहे. स्टार प्लसचा प्रसिद्ध मालिका 'ये है मोहब्बतें' फेम दिव्यांका त्रिपाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या चाहत्यांशी असलेले संबंध टिकवून राहण्यासाठी दिव्यांका नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच दिव्यांकाने अशीच एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
दिव्यांकाने तिच्या पतीसोबतचे म्हणजेच विवेक दहिया (Vivek Dahiya) काही फोटो तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मुंबईच्या रस्त्यावर सुसाट बाईक चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
मुंबईच्या रस्त्यावर दिव्यांकाची बाईक राईड
दिव्यांका त्रिपाठीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती मुंबईच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ब्लॅक कलरच्या जॅकेट, ब्लॅक जीन्स आणि बायकर बूट घालून एका लक्झरी क्रूझर बाईकवर बसलेली दिसत आहे. तिने ब्लॅक कलरचं हॅल्मेटही घातलं आहे. या फोटो आणि व्हिडीओमध्ये दिव्यांकाचा पती आणि टेलिव्हिजन अभिनेता विवेक दहियाही दिसत आहे. विवेकने ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लू डेनिम जीन्ससह बाईकर लूकमध्ये दिसत आहे.
टीव्हीवरील सुसंस्कृत सुनेचा दबंग अंदाज
ही पोस्ट शेअर करताना दिव्यांकाने स्वतःचे #RiderCouple असे कॅप्शन दिले आहे. दिव्यांकाची ही स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीव्हीवरील सुसंस्कृत सुनेचा दबंग बाईक रायडर लूक सर्वांनाच आवडला आहे.
दिव्यांका 'खतरों के खिलाडी'ची रनर अप
दिव्यांका त्रिपाठी रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसली होती. या शोमध्ये दिव्यांकाने जबरदस्त स्टंट करुन सर्वांनाच चकित केले. दिव्यांका या शोची रनर अप होती. 'बनू में तेरी दुल्हन' आणि 'ये है मोहब्बतें' या मालिकेमुळे दिव्यांकाला विशेष प्रसिद्धी मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या :