Tejashri Pradhan : आजही जान्हवीचं मंगळसूत्र मी जपून ठेवलंय, तेजश्रीने सांगितली आयुष्यातली खास गोष्ट
Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिच्या आयुष्यातली एका गोष्टीविषयी नुकताच खुलासा केला आहे.
Tejashri Pradhan : होणार सून मी ह्या घरची (Honar Soon me Hya Gharchi) या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही घरांघरांत पोहचली. तिच्या या भूमिकेवर महाराष्ट्रानेही भरभरुन प्रेम केलं. विशेष म्हणजे जान्हवीचं मंगळसूत्र हे विशेष पंसतीस उतरलं. आजही अनेक दुकानांमध्ये जान्हवीचं मंगळसूत्र हे प्रसिद्ध आहे. या मंगळसूत्राची अभिनेत्री तेजश्री प्रधानने एक गोड आठवण सांगितली आहे.
तेजश्रीने नुकतच तारांगण या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तेजश्रीने या मंगळसूत्राविषयी सांगितलं आहे. आजही तिने हे मंगळसूत्र जपून ठेवल्याची आठवण सांगितली आहे. तेजश्री प्रधानचा हॅशटॅग तदैव लग्नम हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचनिमित्ताने सध्या माध्यमांना देत असलेल्या मुलाखतीमध्ये तिने यावर भाष्य केलं आहे.
तेजश्री प्रधानने सांगितली आठवण
आजवरच्या भूमिकांमधली कोणती एक खास गोष्ट आजही जपून ठेवली आहे? यावर बोलताना तेजश्री म्हणाली की, होणार सून मी ह्या घरची मालिकेवळी माझं जान्हवीचं मंगळसूत्र खूप फेमस झालं होतं. म्हणजे आजही कुठल्या ज्वेलरीच्या दुकानात गेलं तरी त्याबद्दल बोललं जातं. ते इतकं फेमस झालं होतं, त्यामुळे ते मी माझ्याकडे ठेवून घेतलं. आयुष्यातली पहिली फेमस झालेली गोष्ट होती. त्यामुळे मी ते जपून ठेवलं आहे.
देवाने काहीतरी वेगळं ठरवलं होतं - तेजश्री प्रधान
कोणत्या वयात लग्न करणं योग्य आहे, असं तुला वाटतं? यावर बोलताना तेजश्री प्रधानने म्हटलं की, मला तर माझ्या 25तच लग्न करायचं ही, मी केलंही होतं. पण देवाचे काहीतरी वेगळे प्लॅन्स होते.पण माझ्या आताच्या वयातही सगळं छान आहे. आज जर मी जोडीदार निवडण्याचं ठरवलं तर एका वेगळ्या दृष्टीकोनातून मला त्याकडे पाहता येईल. मी लग्न केलं तेव्हाही माझ्या आईवडिलांनी अजिबात जबरदस्ती केली नाही. मला आयुष्यात लहानपणापासून लग्नच करायचं होतं. मला लग्न करायचं अशाच मूडमध्ये होते मी. मला माझ्या पंचवीशीत लग्न करायचंच होतं. मला होममेकरच व्हायचं होतं.
तेजश्री प्रधानविषयी...
लेक लाडकी या घरची, प्रेम हे, अग्गाबाई सासूबाई या मालिकांमध्ये तेजश्रीनं काम केलं आहे. तेजश्रीच्या होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. झेंडा, लग्न पाहावे करुन, शर्यत या चित्रपटांमध्ये तेजश्रीनं काम केलं. ती साध्या काय करते या चित्रपटामधील तेजश्रीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तेजश्री ही तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देते. तेजश्रीच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. तेजश्रीला इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.