Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : निगेटिव्ह रोल करून शिव्या खालेल्ली 'ही' अभिनेत्री होणार नवी 'दयाबेन'? चाहत्यांची मागणी
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) दयाबेनच्या भूमिकेत दिसू शकते.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) दयाबेनच्या भूमिकेत दिसू शकते.
अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'गुम है किसी की प्यार में' या मालिकेनंतर ती अनेक सुपरहिट सिनेमांचा भाग राहिली आहे. यात 'खतरों के खिलाडी' आणि 'बिग बॉस 17' या कार्यक्रमांचा समावेश आहे. दोन्ही कार्यक्रमांत ऐश्वर्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत ऐश्वर्याने दयाबेनची भूमिका साकारावी, अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत. दिलीप जोशीसोबत स्क्रीन शेअर करताना ऐश्वर्याला पाहायची चाहत्यांची इच्छा आहे.
ऐश्वर्या शर्मा दिसणार दयाबेनच्या भूमिकेत?
सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमातून ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) आणि नील भट्ट बाहेर पडले आहेत. 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यानंतर ऐश्वर्याने पतीसोबत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या अंदाजात ती मिमिक्री करताना दिसून आली. ऐश्वर्याचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला. पण दुसरीकडे मात्र तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं.
View this post on Instagram
ऐश्वर्याची मिमिक्री पाहून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दयाबेनच्या भूमिकेसाठी तिचा घेण्याची मागणी चाहते करत आहेत. दयाबेनसारखी ऐश्वर्या बोलते असं चाहत्यांचं मत आहे. एका चाहत्याने लिहिलं आहे,"ऐश्वर्या दयाची भूमिका साकारू शकते".
नकारात्मक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी ऐश्वर्या शर्मा
'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या माध्यमातून ऐश्वर्या शर्मा घराघरांत पोहोचली आहे. ऐश्वर्याने या मालिकेत पाखीची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूपच नकारात्मक होती. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पाखीला खूप ट्रोल केलं. पण तरीही ऐश्वर्याने नकारात्मक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
संबंधित बातम्या