Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे.  साध्याभोळ्या गौरीने वेश बदलल्यापासून मालिकेत दररोज नवे वळण येत आहे. पण आता गौरीचा प्लॅन शालिनीच्या लक्षात आल्याने गौरीच्या अडचणींत वाढ झाली आहे. 

Continues below advertisement


नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे, गौरी मायींच्या खोलीत जाते. दरम्यान शालिनी तिथे पाठमोरी झोपलेली असते. तेव्हा माई समजून गौरी पुढचा प्लॅन शालिनीलाच सांगते.  त्यामुळे आता गौरीचं सत्य शालिनी सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे.





गौरीच्या लूकवरून 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका अनेकदा ट्रोल करण्यात आली आहे. गौरीला खऱ्या रूपात पाहण्याची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. 'सुख म्हणजे नक्की काय असतं'  या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, मीनाक्षी राठोड, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. 


संबंधित बातम्या


KGF 2 : यशच्या 'केजीएफ 2'चा बोलबाला; सहा विक्रम केले नावावर


Jayeshbhai Jordaar Poster : 'जयेशभाई जोरदार'चे पोस्टर रिलीज; रणवीरने विचारलं, जयेशभाईंना मुलगा होणार की मुलगी?


The Delhi Files : 'द दिल्ली फाइल्स' सिनेमात नेमकं काय दाखवणार? विवेक अग्निहोत्रींनी केले स्पष्ट