KGF 2 : यशचा (Yash) 'केजीएफ 2' (KGF 2) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. अशातच या सिनेमाने आतापर्यंत सहा रेकॉर्ड केले आहेत. सध्या प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement


सर्वाधिक स्क्रीनवर रिलीज झालेला सिनेमा 


'केजीएफ 2' हा सिनेमा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. कोरोना महामारीनंतर सर्वाधिक स्क्रीनवर रिलीज होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा एकाच वेळी 4400 हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. 


सर्वात मोठा ओपनिंग सिनेमा


'केजीएफ 2' सिनेमाच्या हिंदी आवृत्तीने पहिल्याच दिवशी 65 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने बाहुबली 2 (41 कोटी), वार (53.35 कोटी) आणि ठग्स ऑफ हिंदुस्तान  (52.25 कोटी)चे ओपनिंग डे कलेक्शन रेकॉर्ड मोडले आहेत.






टीझर आणि ट्रेलरने घातला धुमाकूळ


'केजीएफ 2' सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरने चांगलाच धुमाकूळ घालता होता. टीझरला 250 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ट्रेलरलादेखील 24 तासांत सर्वाधिक व्ह्यूज मिळाले होते. 


सिनेमा ग्रीसमध्ये झाला रिलीज


प्रशांत नील दिग्दर्शित 'केजीएफ 2' हा ग्रीसमध्ये रिलीज होणारा पहिला कन्नड सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा जगभरात 10,000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा कन्नड, तामिळ, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. 


संबंधित बातम्या


Jayeshbhai Jordaar Poster : 'जयेशभाई जोरदार'चे पोस्टर रिलीज; रणवीरने विचारलं, जयेशभाईंना मुलगा होणार की मुलगी?


The Delhi Files : 'द दिल्ली फाइल्स' सिनेमात नेमकं काय दाखवणार? विवेक अग्निहोत्रींनी केले स्पष्ट