The Delhi Files : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अनेक राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अशातच विवेक अग्निहोत्री यांनी 'द दिल्ली फाइल्स' (The Delhi Files) या आगामी सिनेमाची घोषणा केली. दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी 'द दिल्ली फाइल्स'वर भाष्य केले आहे. 


'द दिल्ली फाइल्स' सिनेमावर विवेक अग्निहोत्री म्हणाले, 'द दिल्ली फाइल्स' हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे. या सिनेमात तामिळनाडूचे सत्यदेखील दाखवण्यात आले आहे. हा सिनेमा फक्त दिल्लीवर भाष्य करणारा नसून दिल्ली गेली अनेक वर्षे भारताला कशी उद्ध्वस्त करत आहे ते 'द दिल्ली फाइल्स' या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.





विवेक अग्निहोत्री यांनी मागे ट्वीट करत लिहिले होते, 'द कश्मीर फाईल्स' या सिनेमाचे कौतुक केल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार. या सिनेमाच्या माध्यमातून काश्मीरी पंडितांची गोष्ट मांडता आली. आता वेळ आली आहे नव्या सिनेमासाठी काम करण्याची.#TheDelhiFiles"





 'द कश्मीर फाईल्स' या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता प्रेक्षक  'द दिल्ली फाइल्स' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


संंबंधित बातम्या


Sanjay Dutt : मुलींसमोर ‘कूल’ दिसावं म्हणून ड्रग्स घेण्यास सुरुवात केली, संजूबाबाला लोक ‘चरसी’ म्हणून लागले अन्...


KFG Chapter 2 IMDb Rating : बॉक्स ऑफिसच नाहीतर IMDbवरही ‘केजीएफ 2’चा धुमाकूळ! पाहा किती रेटिंग मिळालं...


Chhavi Mittal : टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलचा ब्रेस्ट कॅन्सरशी संघर्ष, इंस्टाग्रामवर पोस्ट लिहित म्हणाली ‘हे सोपे नाही, पण...’