Aai Kuthe Kay Karte : मालिकाविश्वात सध्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांच्या यादीत अग्रक्रमावर आहे. या मालिकेत दररोज येणारी नवी वळणं प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत आहेत. ‘अरुंधती’पासून ते ‘आशुतोष’पर्यंत सगळीच पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. सध्या या मालिकेत कुटुंब आणि नात्यांमधील ओढाताण असा ट्रॅक सुरु आहे. आता लवकरच पोलीस संजनाला अटक करणार आहेत.


अप्पांनी अरुंधतीच्या नावावर घराचा अर्धा हिस्सा केला होता. मात्र, संजनाने तिच्याकडून तो हिसकावून घेतला आहे. दुसरीकडे कामाचे कागद सांगून तिने घरच्या कागदांवर अनिरुद्धची सही घेतली आणि संपूर्ण समृद्धी बंगला तिने आपल्या नावावर करून घेतला. आता तिचा हाच खोटेपणा सगळ्यांसमोर आला आहे. संजनाने सगळ्यांची फसवणूक करून घर नावावर करून घेतल्याचं कळताच, अरुंधती पोलीस तक्रार करणार आहे.


पोलीस संजनाला अटक करणार?


नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत पोलीस संजनाला पकडून घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र, यावेळी संजना अनिरुद्ध आणि कांचनकडे आपल्याला सोडवा अशी मागणी करते. ‘अनिरुद्ध मी तुझी बायको आहे. हे सगळं मी आपल्यासाठी केलं आहे’, असं संजना म्हणते. मात्र, तिला पोलिसांच्या तावडीतून न सोडवता अनिरुद्ध म्हणतो, ‘लाज वाटते तुला बायको म्हणण्याची, तू कधीच कोणासाठी काही केलं नाही. हे तू आपल्यासाठी नाही, स्वतःसाठी केलं आहेस’, असं म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तर, दुसरीकडे कांचनदेखील संजनाला खडे बोल सुनावते. आता पोलीस संजनाला पकडून नेणार का? घराचं पुढे काय होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.  



हेही वाचा :