एक्स्प्लोर
सिद्धार्थ चांदेकरचं शनायाशी ब्रेकअप, मितालीसोबत जोडी जमली!
हे दोघे कुठे एकत्र दिसेनासे झाले आणि अचानक सिद्धार्थ चांदेकरांच्या जीवनात नवी मुलगी आली. त्या 'मुन्नाभाई एमबीबीएस'च्या गाण्यात येते नं एक गेली की दुसरी.. तसं झालं.
मुंबई : 'माझ्या नवऱ्याची बायको'मधल्या राधिका गुरुनाथ सुभेदारच्या संसारात काडी टाकण्याचं काम शनाया अर्थात रसिका सुनिलने अफलातून केलं. या सीरिअलमधल्या तिच्या लूक आणि भूमिकेची सॉलिड चर्चा आहे. छोट्या पडद्यावरची ही हॉट मुलगी रिअल लाईफमध्ये मात्र सेट होती ती सिद्धार्थ चांदेकरसोबत. अहो म्हणूनच या मालिकेच्या नव्या नव्या शूटला सिद्धार्थ हजर असायचा सेटवर.
पण इकडे मालिकेचे एपिसोड वाढले आणि तिकडे सिद्धार्थ चांदेकरची रुची बदलली. बघता बघता जोडी फुटली आणि मग काय या दोघांचे फोटो दिसेनासे झाले. हे दोघे कुठे एकत्र दिसेनासे झाले आणि अचानक सिद्धार्थ चांदेकरांच्या जीवनात नवी मुलगी आली. त्या 'मुन्नाभाई एमबीबीएस'च्या गाण्यात येते नं एक गेली की दुसरी.. तसं झालं.
सध्या सिद्धार्थ चांदेकरांची जोडी जमलीय ती मिताली मयेकरसोबत. मिताली इन्स्टाग्रामवर सॉलिड अॅक्टिव्ह असते. 'उर्फी'मध्ये आपण तिला पाहिलं होतं. शिवाय झी युवाच्या 'फ्रेशर्स' मालिकेतही चमक होती.
आता सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीचं नातं चांगलंच बहरत आहे. दोघांनी मनगटावर एकत्र टॅटूही काढले आहेत आणि तेही अगदी सेम टू सेम. शनयाची जोडी कुणासोबत झाली आहे की नाही, ते कळायला मार्ग नाही. पण तिचा फोकस मात्र सध्या फक्त गुरुनाथवर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement