एक्स्प्लोर
Advertisement
सावत्र वडिलांच्या अटकेनंतर श्वेता तिवारीच्या मुलीची इन्स्टाग्राम पोस्ट....
सावत्र मुलगी पलक तिवारीचा विनयभंग केल्याप्रकरणी अभिनव कोहलीला अटक करण्यात आली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीच्या तक्रारीनंतर तिचा पती अभिनव कोहलीला अटक करण्यात आली. आता या प्रकरणी तिची मुलगी पलक तिवारीने मौन सोडलं आहे. पलक तिवारीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर भलीमोठी पोस्ट करुन स्पष्टीकरण दिलं आहे. "कौटुंबिक हिंसाचाराची बळी आई नाही तर मी झाले आहे," असं तिने स्पष्ट केलं. "तसंच अभिनव कोहलीने माझी छेडछाड केली नाही किंवा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला नाही. पण आक्षेपार्ह टिप्पणी मात्र नक्कीच केली," असंही तिने पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
पलकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून तिने या प्रकरणी भाष्य केलं आहे. सर्वात आधी तिने पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले. त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. तिने लिहिलं आहे की, "याबाबतीत मीडियाकडे तथ्य नाहीत. मी, पलक तिवारी, अनेक वेळा कौटुंबिक हिंसाचाराची बळी पडले आहे, माझी आई नाही. ज्या दिवशी तक्रार नोंदवण्यात आली, तो दिवस सोडून त्याने (अभिनव कोहली) माझ्या आईला कधीही मारहाण केली नाही."
मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अभिनेत्री श्वेता तिवारीच्या दुसऱ्या पतीला अटक
पलकने अफवा पसरवणाऱ्यांनाही खडेबोल सुनावले. आपल्या आईबाबत ती म्हणाली की, "ती सर्वात खंबीर व्यक्ती आहे आणि आपल्यापैकी मीच एकमेव व्यक्ती आहे, जी तिच्या संघर्षाच्या दिवसांची साक्षीदार आहे. त्यामुळे फक्त माझं मतच जास्त महत्त्वाचं आहे."
अभिनवने पलकला अश्लील टिप्पणी करत थोबाडीत मारल्याचं वृत्त होतं. यावर स्पष्टीकरण देताने पलकने लिहिलं आहे की, "अभिनव कोहलीने कधीही माझ्यासोबत शारीरिक छेडछाड केली नाही किंवा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला नाही. पण तो आक्षेपार्ह आणि वाईट टिप्पणी करायचा. असे शब्द वापरायचा जे कोणत्याही महिलेच्या मान-सन्मानावर प्रश्न उपस्थित करतील."
आई श्वेताबद्दल पलकने लिहिलं आहे की, 'मी आतापर्यंत जेवढ्या लोकांना भेटले आहे, त्यांच्यात माझ्या आईला मान-प्रतिष्ठा आहे. ती स्वावलंबी आहे, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ती कोणत्याही पुरुषावर अवलंबून राहिली नाही." या संपूर्ण मेसेजसह पलकने एक संपूर्ण ब्लँक फोटो पोस्ट केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement