Shashank Ketkar: "निदान आज तरी..."; सिग्नलबद्दल शशांक केतकरनं केली पोस्ट, शेअर केला 'हा' फोटो
Shashank Ketkar: नुकतीच शशांकनं इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. शशांकनं या पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Shashank Ketkar: अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. शशांक केतकर हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स बरोबरच त्याच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे देखील चर्चेत असतो. नुकतीच शशांकनं इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. शशांकनं या पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ विविध रंगांचे कपडे लोक परिधान करतात. आज तिसऱ्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान केले जातात. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लाल रंगा आणि सिग्नल याबाबत शशांकनं इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शशांकनं सिग्नलचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला शशांकनं कॅप्शन दिलं, “निदान आज तरी लाल सिग्नलचा आदर करा.”
शशांकनं 31 दिवस, गोष्ट एका पैठणीची या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर होणार सुन मी ह्या घरची, सुखाच्या सारिंनी हे मन बावरे या मालिकांमुळे शशांकला विशेष लोकप्रियता मिळाली. होणार सुन मी ह्या घरची या मालिकेमध्ये शशांकनं साकारलेल्या श्री या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या शशांकची मुरांबा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शशांकच्या आगामी मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
शशांकची आगामी वेब सीरिज
स्कॅम 2003 या हिंदी वेब सीरिजमधून शशांक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'स्कॅम 2003' ही वेब सीरिज 1 सप्टेंबर 2023 रोजी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari) आणि भरत जाधव (Bharat Jadhav) हे कलाकार देखील या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे.
View this post on Instagram
शशांक केतकर हा सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. त्याला इन्स्टाग्रामवर 400K फॉलोवर्स आहेत. शशांक हा त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
इतर महत्वाच्या बातम्या: