(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shark Tank India Season 3: नवनवीन बिझनेस आयडिया आणि शार्क्सच्या ऑफर्स; शार्क टँग इंडियाच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात!
Shark Tank India Season 3: 'शार्क टँक इंडिया' या कार्यक्रमाचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शार्क टँक इंडिया-3 च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
Shark Tank India Season 3: छोट्या पडद्यावरील 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता 'शार्क टँक इंडिया' या कार्यक्रमाचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'शार्क टँक इंडिया' या शोमध्ये स्वत:चा व्यवसाय असणारे लोक येतात. हे लोक शोमधील परीक्षकांना त्यांची बिझनेस आयडिया सांगतात.
'शार्क टँक इंडिया' या कार्यक्रमाच्या ट्विटर अकाऊंटवरुन या सीझनबाबत माहिती देण्यात आली आहे. 'शार्क टँक इंडिया' या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे, अशी माहिती 'शार्क टँक इंडिया' च्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रेक्षकांना देण्यात आली आहे. शार्क टँक इंडिया' या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीझनमध्ये विनीता सिंग (Vineeta Singh), अमन गुप्ता (Aman Gupta), नमिता थापर (Namita Thapar), अमित जैन (Amit Jain), अनुपम मित्तल (Anupam Mittal) हे शार्क्स परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. "लाइट्स, कॅमेरा, शार्क; शार्क टँक इंडियाच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात!" असं कॅप्शन या ट्वीटला देण्यात आलं आहे.
Lights 🔆 Camera 🎥 Sharks 🦈
— Shark Tank India (@sharktankindia) September 23, 2023
The Shark Tank India Season 3 shoot begins!
We welcome the Sharks @amangupta0303, @namitathapar, @AnupamMittal, @vineetasng, and @amitjain for the first schedule.
Stay tuned for more Shark reveals and exciting updates! pic.twitter.com/B221tSJq7T
'शार्क टँक इंडिया' या शोमध्ये स्वत:चा व्यवसाय असणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या बिझनेस आयडिया घेऊन येतात. त्यामधील काही कल्पना या अतरंगी देखील असतात. या शोमधील परीक्षक हे शोमध्ये येणाऱ्या व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांच्या आयडिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात.
आता 'शार्क टँक इंडिया' या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाच्या पाहिल्या सीझनमध्ये अश्नीर ग्रोवर आणि ममाअर्थ कंपनीच्या सहसंस्थापक गझल अलग या दोन शर्क्सनं परीक्षकाची भूमिका साकारली होती. आता 'शार्क टँक इंडिया' या कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये शार्क्स कोणकोणत्या बिझनेस आयडियांना ऑफर्स देणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
नमिता थापर (Namita Thapar), अनुपम मित्तल (Anupam Mittal), अमित जैन (Amit Jain), पियूष बंसल ( Peyush Bansal) आणि विनीता सिंह (Vineeta Singh) या शार्क्सनं शार्क टँक-2 या कार्यक्रमाचे परीक्षण केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Shark Tank India 3 : 'शार्क टॅंक इंडिया 3' लवकरच होणार सुरू; प्रोमो आऊट!