Bigg Boss Marathi Season 5 Sangram Chougule : 'बिग बॉस मराठी'च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारा संग्राम चौगुले आहे तरी कोण?
Bigg Boss Marathi Season 5 Sangram Chougule : संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.
![Bigg Boss Marathi Season 5 Sangram Chougule : 'बिग बॉस मराठी'च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारा संग्राम चौगुले आहे तरी कोण? Sangram Chougule wild card entry in Bigg Boss Marathi Season 5 know about who is Sangram Chougule Bigg Boss Marathi Season 5 Sangram Chougule : 'बिग बॉस मराठी'च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारा संग्राम चौगुले आहे तरी कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/09/ff10e54688e095336fe8243ec8f727391725847537990290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi Season 5 Sangram Chougule : यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा (Bigg Boss Marathi Season 5) आता सातवा आठवडा सुरू झाला आहे. या सातव्या आठवड्यात आता घरात नवा सदस्य येणार आहे. सहा वेळा ठरलेला 'मिस्टर इंडिया', पाच वेळा 'महाराष्ट्र श्री' चा मानकरी ठरलेला संग्राम चौगुले (Sangram Chougule) याची बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. 'भाऊचा धक्का'वर शोचा होस्ट रितेश देशमुखने संग्रामचे स्वागत केले. आजच्या एपिसोडमध्ये आता संग्राम बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे आता घरातील समीकरणात काय बदल होतील, याकडेही प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या आहेत.
बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन अनेक ट्वीस्ट गाजतोय. घरातील सदस्यांमध्ये टास्क दरम्यान राडा होत आहे. तर, इतरवेळी कल्लादेखील होतोय. प्रत्येक आठवड्यानुसार घरातील समीकरणे बदलत आहेत. तर, दुसरीकडे प्रेक्षकांना वाईल्ड कार्डने बिग बॉसच्या घरात कोणाची एन्ट्री होणार, याची उत्सुकता लागली होती. वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी सध्या बरीच नावं चर्चेत होती. मात्र, रविवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर आता मिस्टर इंडिया असलेल्या संग्राम चौगुलेची एन्ट्री झाली आहे.
View this post on Instagram
कोण आहे संग्राम चौगुले?
मुळचा कोल्हापूरचा असलेल्या संग्राम चौगुले हा शरीरसौष्ठवपटू असून सध्या पुण्यात स्थायिक आहे. संग्राम हा सहा वेळा 'मिस्टर इंडिया' तर 2012 आणि 2014 या असे दोन वेळा 'मिस्टर युनिव्हर्स' होण्याचा मान संग्रामने मिळवला होता. संग्रामने अभिनयाच्या क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं आहे. संग्राम हा 2016 साली मराठी रुपेरी पडद्यावर 'दंभ' या चित्रपटातून झळकला होता. त्यानंतर त्याने 'आला माझ्या राशीला' मध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
संग्रामचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन्स फॉलोअर्स असून सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवरही त्याचे चाहते आहेत. सोशल मीडियावर संग्रामचे वर्कआउट करतानाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)