Sangram Chougule : 'ज्या कामासाठी मी आतमध्ये गेलो होतो...', अरबाज बाहेर आल्यानंतर संग्रामने रुग्णालयातून दिली प्रतिक्रिया
Sangram Chougule : अरबाज पटेल घरातून बाहेर आल्यानंतर संग्राम चौघुलेनेही प्रतिक्रिया दिली असल्याचं पाहायला मिळतंय.
Sangram Chougule : बिग बॉसच्या घरातून (Bigg Boss Marathi New Season) वैद्यकीय कारणांमुळे संग्राम चौघुले (Sangram Chougule) हा घराबाहेर पडला. त्यानंतर त्याच आठवड्यात एलिमिनेशनमध्ये अरबाज पटेलनेही (Arbaz Patel) घराचा निरोप घेतला. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही सध्या आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. अरबाज घराबाहेर गेल्यानंतर निक्की आता एकटी पडली आहे, त्याचाही प्रेक्षकांना आनंद झालाय. पण या सगळ्यावर आता संग्रामने रुग्णालयातून प्रतिक्रिया दिली असल्याचं पाहायला मिळतंय.
संग्राम चौघुलेने घरामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. त्यानंतर अरबाज पटेलसाठी एक मोठा स्पर्धक घरात गेल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली होती. पण संग्रामचा खेळ कमी पडत असल्याचं म्हटलं जात होतं. त्यावरुन भाऊच्या धक्क्यावरही रितेश भाऊंनी संग्रामच्या खेळवरुन त्याची कानउघडणी केली होती. पण एका टास्कदरम्यान संग्रामच्या हाताला दुखापत झाली आणि त्याला घराचा निरोप घ्यावा लागला.
संग्रामने केली पोस्ट शेअर
संग्रामने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, 'मी तर बिग बॉसच्या घरातून बाहेर आलो पण ज्यासाठी मी त्या घरात अलेलो ते काम तर झालं. त्यानी त्याच्या वैयक्तिक गेम वर जास्त फोकस नाही केलं म्हणून काल त्याचं एलिमिनेशन झालं.'
संग्रामने व्हिडीओही केला शेअर
दरम्यान अरबाज नॉमिनेट झाल्यानंतर संग्रामने व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, मित्रांनो, ज्या कामासाठी तुम्हाला वाटत होतं की मी आत जायला पाहिजे, ते काम झालं. माझा हात फ्रॅक्चर झाला आहे, पण शेवटी तुम्हाला जे वाटत होतं की अरबाज बाहेर जायला पाहिजे होता, ते झालं. तो माझ्या एलिमिनेशनमुळे बाहेर गेला आहे. बी टीमला हे पटणार नाही, पण तुमची जी इच्छा होती की ती पूर्ण झाली.
पुढे त्याने व्हिडीओ म्हटलं की, “अरबाजविषयी माझ्या मनात काही वाईट नाही. पण तो स्वतःमुळेच बाहेर गेला आहे. तो त्याचा गेम खेळला असता तर नक्कीच तो आत असता. तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. पण मला त्यासाठी माझा हात फ्रॅक्चर करून घ्यावा लागला आहे. अरबाज तुला भविष्यासाठी शुभेच्छा. तू चांगला खेळाडू आहेस पण स्वतःच्या मतांवर हा गेम तू खेळला असतास तर नक्कीच जिंकू शकला असता. भविष्यासाठीही लक्षात ठेव, आपण दुसऱ्यांच्या मताप्रमाणे खेळलो, त्यातही ती लोक प्रेक्षकांना आवडत नसतील तर मग नेहमी असंच होतं,”
View this post on Instagram