Mohammad Nazim: 'साथ निभाना साथिया' फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; मोहम्मद नाझीमच्या वडिलांचे निधन
Mohammad Nazim: मोहम्मद नाझीमच्या वडिलांचे निधन झाले आहे. मोहम्मदनं नुकतीच एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन ही दु:खद माहिती चाहत्यांना दिली आहे.
Mohammad Nazim: छोट्या पडद्यावरील 'साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya) या मालिकेत 'अहम मोदी' ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता मोहम्मद नाझीम (Mohammad Nazim) खिलजीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोहम्मद नाझीमच्या वडिलांचे निधन झाले आहे. मोहम्मदनं नुकतीच एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन ही दु:खद माहिती चाहत्यांना दिली आहे.
मोहम्मद नाझीमनं शेअर केली भावूक पोस्ट
मोहम्मद नाझीमनं सोशल मीडियावर त्याच्या वडिलांसोबतचे आणि आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "काल दुपारी माझे अब्बांचे निधन झाले. त्याला गमावणे, त्याला दूर जाताना पाहणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवस होता"
"आज मी माझे आई-वडिल नसल्यामुळे दुःखी आहे. मला माहित आहे की, अम्मी अब्बा हे दोघेही मला बघत आहेत. मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगा आहे ज्याला तुम्ही दोघे मिळाल. दुआ में याद रखना ", असंही मोहम्मदनं पोस्टमध्ये लिहिलं आहे. मोहम्मदनं पुढे पोस्टमध्ये लिहिलं, सर्व "लोकांचे, डॉक्टरांचे, माझे कुटुंबीय आणि कुटुंबासारखे मित्र यांचे आभार मानणे पुरेसे ठरणार नाही"
View this post on Instagram
मोहम्मद नाझीमनं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी मोहम्मदच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मोहम्मद नाझीमला साथ निभाना साथिया या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. ही मालिका 2010 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत जिया मानेक आणि देवोलीना भट्टाचार्जी यांच्यासोबत मोहम्मद नाझीमनं काम केलं. साथ निभाना साथिया व्यतिरिक्त नाझिमनं उडान, तेरा मेरा साथ रहे, रूप: मर्द का नया स्वरूप आणि बहू बेगम या शोमध्ये देखील काम केलं आहे. मोहम्मद नाझीम हा सोशल मीडियावर रिल्स शेअर करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. मोहम्मद नाझीम हा इन्स्टाग्रामवर विविध रिल्स शेअर करत असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. त्याला इन्स्टाग्रामवर 649K फॉलोवर्स आहेत. मोहम्मदच्या सोशल मीडियावरील पोस्टवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
संबंधित बातम्या:
Gopi Bahu Act In Bengaluru : 'बंगळुरूची गोपी बहू'; डिटर्जंटनं धुतला लॅपटॉप, पतीनं उचललं 'हे' पाऊल!