एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : श्वेता बदलणार डीएनए सॅम्पल! पुन्हा एकदा दीपिका आणि दीपाची ताटातूट होणार?

Rang Majha Vegla : स्टार प्रवाहची ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरते आहे.

Rang Majha Vegla : स्टार प्रवाहची ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरते आहे. या मालिकेने प्रेक्षकांना चांगलेच गुंतवून ठेवले आहे. टीआरपीच्या शर्यतीत देखील ही मालिका अग्रस्थानी आहे. आता या मालिकेच्या कथानकाने नवे वळण घेतले आहे. मालिकेच्या कथानकातील भावनिक धागा प्रेक्षकांना या मालिकेशी जोडून ठेवत आहे. आता या मालिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. सध्या मालिकेत दीपिकाच्या कस्टडीवरून वाद सुरु आहेत.

दीपिका ही आपलीच मुलगी असल्याचे आता दीपाला कळले आहे. त्यामुळे दीपिकाचा ताबा आपल्याला मिळावा यासाठी ती कार्तिकच्या विरोधात लढणार आहे. या कायदेशीर लढाईत आता नेमका विजय कुणाचा होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. मात्र, आता या प्रकरणातही श्वेताने उडी घेतली आहे. ती आता दीपा आणि दीपिकाचे डीएनए सॅम्पल बदलणार आहे.

श्वेताला बिंग फुटण्याची भीती!

दीपा दीपिकाला मिळवण्यासाठी डीएनए चाचणी करणार असल्याचे कळताच, श्वेताच्या पायाखालची जमीन सरकली आहे. डीएनए चाचणी झाली तर दीपिका कार्तिक आणि दीपाचीच मुलगी असल्याचे सिद्ध होईल. इतकेच नाही तर, कार्तिक कधीच बाबा होऊ शकणार नाही, हे गोष्ट खोटी असून आपलं कारस्थान आता उघडकीस येईल या भीतीने श्वेता हादरली आहे. हे सगळं टाळण्यासाठी आता तिने एका माणसाला दोघींचे डीएनए सॅम्पल बदलण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे.  

आयेशा आणि श्वेताचा नवा प्लॅन

दीपिकाची कस्टडी मिळवण्यासाठी कोर्टाने दीपिका आणि दीपाची डीएनए चाचणी करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार ठरवलेल्या हॉस्पिटलमध्ये ही चाचणी होणार होती. मात्र, आम्हाला या हॉस्पिटलमध्ये चाचणी करायची नाही, अशी नोटीस कार्तिकच्या वतीने आयेशाने दीपाला पाठवली. दोघींची डीएनए चाचणी इनामदारांच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये करावी, अशी मागणी आयेशाने केली. दीपाने देखील त्यांची ही मागणी मान्य केली आहे. मात्र, हॉस्पिटलमध्ये दोघीच्या डीएनए सॅम्पलमध्ये अदलाबदली होऊ शकते हे कुणाच्याही लक्षात आलेले नाही. हा आयेशा आणि श्वेता यांनी मिळून केलेला प्लॅन असून, आतापर्यंत सगळ्या गोष्टी यानुसारच घडल्या आहेत.

श्वेताने पाठवलेला माणूस डीएनए सॅम्पल बदलण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो. मात्र, हॉस्पिटलच्या दारातच सौंदर्या इनामदार उभी असल्याने त्याला तिथेच थांबावे लागते. त्यामुळे आता या दोघींचा प्लॅन यशस्वी होणार की, फसणार? हे येत्या भागांमधून कळणार आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 7 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Friendship Day 2022 : दोस्ती, मैत्री, यारी अन् बरंच काही! रक्ताच्या नात्यापलीकडच्या हळव्या बंधाची कथा सांगणारे मराठी चित्रपट!

महत्त्वाच्या बातम्या

NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget