मुंबई : अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे. अयोध्येच्या चौकाचौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत. कोरोनामुळे हा सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यामुळे अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटी आपल्या या ऐतिहासिक आणि भव्य सोहळ्याबाबतच्या आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. याच निमित्ताने 80च्या दशकात टेलिव्हिजनवर गाजलेली मालिका 'रामायण' यात प्रभू श्रीराम आणि सीता यांची भूमिका साकरलेले अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनीही आपल्या भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या आहेत.


'रामायण' या गाजलेल्या मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसवणारे अरुण गोविल यांनी अयोध्येत होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याबाबत आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी राम मंदिरासाठी गेली अनेक वर्ष संघर्ष करणाऱ्या रामभक्तांचे आभार मानले आहेत.


अरुण गोविल यांनी ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, 'अयोध्येत राम मंदिरासाठी गेली अनेक वर्ष सातत्यानं संघर्ष करणाऱ्या वरिष्ठ आणि त्यांचा संघर्ष भूमिपूजनापर्यंत घेऊन जाणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा कोटी कोटी प्रणाम. तुम्हा सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळेच आम्हाला हा दिवस पाहण्याचं सौभाग्य मिळत आहे. जय श्रीराम'


अरुण गोविल यांचं ट्वीट :



अरुण गोविल यांनी आणखी एक ट्वीट केलं होतं. राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत अरुण गोविल यांनी ट्वीट केलं होतं. ट्वीटमध्ये ते म्हणाले की, 'भगवान श्रीरामांचं मंदिराच्या भूमिपूजनाची वाट सर्व जनता करत आहे. अयोध्येत भूमिपूजनासोबतच एका दिव्य युगाचा आरंभ होणार आहे. जय श्रीराम' तसेच आणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिरात सुवर्ण कलश लावले तरीही नतमस्तक मात्र मंदिराच्या पायऱ्यांवरच व्हायचं आहे.'


अरुण गोविल यांचं ट्वीट :



80च्या दशकात 'रामायण' या गाजलेल्या मालिकेतील सीतेची भूमिका साकरणाऱ्या दीपिका चिखलिया यांना राम मंदिर भूमिपूजनाची प्रतिक्षा आहे. कोरोनाच्या प्रादर्भावामुळे राम मंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहायला न मिळाल्याची खंत अभिनेत्रीला वाटत आहे.


दीपिका चिखलिया यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत म्हणाल्या आहेत की, 'रामललाच्या घरी परतण्याची वाट पाहत आहे.'


दीपिका चिखलिया यांची इन्स्टाग्राम पोस्ट :



दरम्यान, अयोध्यानगरी पंतप्रधान नरेद्र मोदींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पंतप्रधान नरेद्र मोदी येण्याच्या एक दिवस आधी अयोध्येला लागून असलेल्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. जे छोटे मोटे मार्ग आहेत त्याठिकाणी बॅरिकेटींग लाऊन तपासणी सुरु ठेवण्यात येणार आहे. अयोध्याच्या शेजारील जनपद बस्ती, गोंडा, आंबेडकरनगर, बाराबंकी, सुलतानपुर, अमेठी या शहरांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अयोध्येत शरयू नदीच्या माध्यामातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर प्रदेश सराकरची जलसेना तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्ही, राखीव दल, वाहतुक पोलिसांच्या तुकड्या रस्त्यारस्त्यावर तैनात करण्यात आल्या आहेत.


पाहा व्हिडीओ : भूमिपूजनाच्या दिवशी अयोध्या नेमकी कशी आहे? चौकाचौकात काय वातावरण?



महत्त्वाच्या बातम्या :