मुंबई : भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचं कर्तृत्व हिमालयाएवढं मोठं आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबानेही मोलाची मदत केली. पत्नी, त्यांचा भाऊ आदी अनेक कुटुंबीय आपापल्या परिने यात सहभागी झाले. आज बाबासाहेबांचे अनेक फोटो उपलब्ध आहेत. पण त्यांच्या कुटुबियांसह असलेला एकमेव फोटो आहे तो राजगृहामध्ये. तिथली एक तसबीर बाबासाहेबांचं कुटुंब दर्शवते.

सध्या स्टार प्रवाहवर सुरु असलेल्या बाबासाहेबांच्या मालिकेत हा फोटो पुन्हा रिक्रिएट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा एकमेव फोटो आहे, हे लक्षात घेऊन त्या फोटोसाठी लागणारा आवश्यक सीन या मालिकेत घालण्यात आला आहे. राजगृहात सहकुटुंब राहायला आल्यानंतर बाबासाहेबांनी हा खास फोटो काढून घेतला होता. त्याकाळी फोटो काढून घ्यायला फारसं कुणी धजावत नसे. बाबासाहेबांनी सर्वांची मनधरणी करत हा योग जुळवून आणला. हा ऐतिहासिक प्रसंग मालिकेत पुन्हा एकदा पाहायला मिळेल.



या फोटोत डावीकडून पहिलाच आहे बाबासाहेबांचा मुलगा यशवंता म्हणजेच अभिनेता स्वप्निल हिंगडे, त्याच्या बाजूला बाबासाहेबांच्या भूमिकेत सागर देशमुख, रमाबाईंच्या भूमिकेत शिवानी रांगोळे, रमाबाईंची जाऊ  लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री अमृता मालवडकर आणि त्यांच्या बाजूला बाबासाहेबांचा पुतण्या मुकुंदा म्हणजेच अभिनेता सचिन बोबडे. फोटोमध्ये दिसणाऱ्या बाबासाहेबांच्या लाडक्या कुत्र्याचं नाव टॉबी असं होतं.

योगायोगाने डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या सेटवरही एक कुत्रा पहिल्या दिवसापासून सर्वांचा जिगरी दोस्त आहे आणि त्याला सेटवर लाडाने सर्व लंबू  हाक मारतात. सागर आणि शिवानीचा लंबूवर विशेष जीव आहे. अशा पद्धतीने वास्तवातला फोटो मालिकेत रिक्रिएट व्हायची ही पहिलीच वेळ आहे.


महत्त्वाच्या बातम्या :