Premachi Goshta Latest Updates : कोळी कुटुंबात संशयाने आणलं वादळ; इंद्रा मुक्ताला घराबाहेर काढणार, सागर काय करणार?
Premachi Goshta Latest Updates : आधीच तिजोरीतून दागिने गेल्याने इंद्रा संतापात असते. त्यात सागरने मुक्तावर प्रश्नांची सरबत्ती केल्याने इंद्राच्या संतापाला आणखीच धार येते.
Premachi Goshta Latest Updates : मुक्ता ही एका तरुणाला दागिने देत असल्याचे पाहतो. त्यानंतर आता कोळी कुटुंबीयांच्या घरात संशयाने वादाचे वादळ आणले आहे. आजच्या एपिसोडमध्ये कोळी कुटुंबातील वाद दिसणार आहेत. मुक्तावर सागर आणि इंद्राकडून प्रश्नांची सरबत्ती करतात. तर, मुक्ता मौन बाळगते. त्यातून इंद्रा आणखीच संतापते. मुक्ताला इंद्रा घराबाहेर काढते. तर, दुसरीकडे सागरचा मुक्तावर विश्वास आहे का? याची उत्तरे 'प्रेमाची गोष्ट'च्या (Premachi Goshta) आजच्या एपिसोडमध्ये दिसतील.
मागच्या एपिसोडमध्ये मुक्ताही एका तरुणाला दागिने देत असल्याचे सागर पाहतो. त्याचाच धागा पकडत मुक्ता घरी आल्यानंतर सागर तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करतो. सागर मुक्ताला विचारतो की, अशी कोणती एमर्जन्सी होती की तुमचे दागिने घेऊन तुम्हाला घराबाहेर जावे लागले, नॉन व्हेजच्या वासाने तुम्हाला त्रास होतो, पण नॉन व्हेजचा डबा स्वत: भरून घेऊन जावे लागले, तुम्ही क्लिनिकमध्ये गेला नाहीत...ज्यांना तुम्ही भेटला तो तुमच्याच वयाचा होता... तरुण आणि स्मार्ट होता... कोण हा तरुण ज्याला तुम्ही दागिने दिले असे प्रश्न सागर मुक्ताला विचारतो .
आधीच तिजोरीतून दागिने गेल्याने इंद्रा संतापात असते. त्यात सागरने मुक्तावर प्रश्नांची सरबत्ती केल्याने इंद्राच्या संतापाला आणखीच धार येते. इंद्रादेखील मुक्तावर संतापून नको ते बोलते. मोठी संस्कार देणारी शहाणीबाई म्हणे... हे खोटं बोलणारे संस्कार कोण करतं असा सवाल इंद्रा करते. त्यावेळी मुक्ता ही गैरसमज करून घेऊ नका, माफ करा असे मुक्ता इंद्राला म्हणते.त्यावर इंद्रा मनात खोट असले की काही लपवावं लागत नाही असे सुनावते. त्यावर जी खोटं बोलतात ती माणसं माझ्या घरी राहत नाही असे इंद्रा मुक्ताला ठणकावते.
स्वाती आणि तिच्या नवऱ्याला दिलेली शपथ मुक्ता मोडणार?
सागरच्या आयुष्यात प्रत्येक मुलगी विश्वासघात करते असे इंद्रा म्हणते.आमच्याशी खोट बोलून परपुरुषाला कशी भेटायला जाते असा प्रश्न इंद्रा करते. तर, आपल्यावर होत असलेले नको ते आरोप ऐकून मुक्ता मनाने दुखावते.मुक्ता ही स्वाती आणि तिच्या नवऱ्याने दिलेल्या शपथेमुळे शांत बसते. ती काही उत्तरे देत नाही.
मुक्ताचे आई-वडील आले तिच्या सासरी...
कोळी कुटुंबाच्या घरात जोरात आरडाओरड सुरू असते. त्यावेळी मुक्ताची आईदेखील तिथे येते. त्यावेळी मुक्ताची आई तिची बाजू घेत वेळ आली की मुक्ता सगळं काही सांगेल असे म्हणते. त्यावर इंद्रा ही वेळ आताच आली आहे असे समजा असे म्हणते. त्यानंतरही मुक्ता इंद्राला काहीच सांगत नाही.
इंद्राने मुक्ताला घराबाहेर काढले
मुक्ताकडून कोणतीच उत्तरे मिळत नसल्याने आणि मुक्ताही सागरचा विश्वासघात करत असल्याचा इंद्राचा समज झाला आहे. मुक्ताने यावर काहीच उत्तरे न दिल्याने इंद्रा मुक्ताला घराबाहेर काढते.
सागर काय करणार?
इंद्राने मुक्ताला घराबाहेर काढल्यावर सागर काय करणार? सागरचा मुक्तावर विश्वास आहे का, सागर मुक्ताची अगतिकता समजून घेत आहे का, या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना सापडणार आहेत.