Premachi Goshta Serial Update : सागर-मुक्ताच्या आयुष्यात येणार नवं संकट; सूड घेण्याच्या तयारीत आहे सावनी-हर्षवर्धनचा मोहरा!
Premachi Goshta Serial Update : सागर-मुक्ताला उद्धवस्त करण्यासाठी हर्षवर्धन आपला नवा मोहरा समोर आणणार आहे. इकडं मिहिर-मिहिकाच्या लग्नासाठी माधवीचे मन वळण्यासाठी सागर-मुक्ताची धडपड सुरू आहे.
Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आता येत्या काही एपिसोडमध्ये मोठी वळणं येणार आहेत. मिहिरने अपमान केल्याच्या भावनेने सावनीची चिडचिड होतेय. तर, सागर-मुक्ताला उद्धवस्त करण्यासाठी हर्षवर्धन आपला नवा मोहरा समोर आणणार आहे. इकडं मिहिर-मिहिकाच्या लग्नासाठी माधवीचे मन वळण्यासाठी सागर-मुक्ताची धडपड सुरू आहे.
सागर-मुक्ता घालणार मिहिरची समजूत
माधवीकडून मिहिर-मिहिकाच्या लग्नाला विरोध झाला आहे. लग्न मोडल्याने मिहिर खूपच नाराज झाला आहे. मिहिर मुक्ताला सागरचे त्याच्यासाठी असलेले महत्त्व सांगतो. मिहिरने मुक्ताला सांगतो की, मी सावनीला माफ करू शकणार नाही. जेव्हा ती त्या हर्षला भेटायची तेव्हा त्याने तिला काहीवेळा मदत केली होती. पण, मला तिच्या हेतूबद्दल काहीच कळत नव्हते.ही चूक लक्षात आल्यानंतर तो स्वत:लाच माफ करू शकत नव्हता. मिहिरला मुक्ता समजावते की तेव्हा तो लहान होता, त्यामुळे तसा वागला असशील. त्यावर मिहिर सांगतो की, सागर त्याच्यासाठी मोठ्या भावापेक्षा जास्त आहे. माझ्यासाठी हे ताईचं सासर नव्हते, ते माझ्या दादूसचं घर होतं. हे घर सावनीने उद्धवस्त केले.
सागरही मिहिरला मनातील सगळी अडी, राग काढण्यास सांगतो. आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठी घडते असे सागर मिहिरला सांगतो. सावनी जर वाईट वागली नसती तर माझ्या आयुष्यात मुक्तासारखी चांगली बायको नसती. सई आणि तू माझ्याजवळ आहे असे सागर सांगतो. सागरची समजुतीची भाषा पाहून मुक्ताला मनोमन खूप आनंद होतो.
सावनीचा जळफळाट, हर्षवर्धनच्या मोहऱ्याने होणार आनंद
मिहिरच्या मनात आपल्याबद्दल द्वेष पाहून सावनीचा जळफळाट होत असतो. तोच हर्षवर्धन कार्तिकला घेऊन सावनी समोर उभा राहतो. कार्तिकला आपल्या ओळखीच्या जोरावर मी तुरुंगातून बाहेर काढले असल्याचे हर्षवर्धन सांगतो.
सागरचे कुटुंब उद्धवस्त करून राहणार असल्याचे कार्तिक सांगतो. सागर-मुक्ताला आता सुखाची झोप लागू देणार नाही, असे कार्तिक म्हणतो. सागरने घरातील लोकांसमोर आपल्याला उघडं पाडल्याचा राग त्याच्या मनात असतो. त्यातून तो सूड घेण्यासाठी आता धडपड करत आहे.
माधवीचे मन वळण्यासाठी सागर-मुक्ताचे प्रयत्न
मुक्ताकडून आई माधवीची मिहिका-मिहिरच्या लग्नाला परवानगी मागण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. मुक्ता माधवीसाठी गुलाबजाम बनवते. गुलाबजाम देऊन तुम्हाला मिहिर-मिहिकाच्या लग्नासाठी होकार देणार नसल्याचे सांगते. सागरही माधवीसाठी तिच्या आवडीच्या रंगाची साडी आणतो. तर, सई आजीसाठी ग्रीटिंग कार्ड आणते. हे तुम्हाला शोभतंय का, असे सागरला माधवी विचारते. तुम्ही काहीही केले तरी मी मिहिर-माधवीच्या लग्नाला परवानगी देणार नसल्याचे माधवी सांगते.