एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : सागरकडून कार्तिकचा विकृत चेहरा उघड; इंद्रा मागणार का मुक्ताची माफी?

Premachi Goshta Serial Update : इंद्रा मुक्ताची माफी मागणार का? मुक्ता पुन्हा आता आपल्या घरी राहायला येणार का, अशा प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहे. आजचा एपिसोड हा काहीसा भावूक करणारा असणार आहे.

Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत आज मोठं नाट्य पाहायला मिळणार आहे. सागर आपल्या मोहिमेत यशस्वी होणार असून कार्तिकचा विकृत चेहरा घरातील लोकांसमोर उघड करणार आहे. मुक्तावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्तिकला सागर चांगलाच चोप देणार आहे. आता, इंद्रा मुक्ताची माफी मागणार का? मुक्ता पुन्हा आता आपल्या घरी राहायला येणार का, अशा प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहे. आजचा एपिसोड हा काहीसा भावूक करणारा असणार आहे.

कार्तिकची पळापळ... 

कार्तिक गाशा गुंडाळून घर सोडून जाण्याच्या तयारीत असतो. त्याच वेळी सागर येतो. सागरला पाहुन कार्तिक बावचाळतो. कसली तयारी करताय, असे सागर विचारतो. त्यावर कार्तिक त्याला अलिबागला जाण्याची तयारी करत असल्याचे म्हणतो. बरेच दिवस गेलो नाही,  आता तिथेच एक दीड महिना राहिल असे सांगतो. सागरही त्याला तुझा नवा मोबाईल दुपारपर्यंत येईल असे सांगतो आणि निघून जातो.

सागर करणार मुक्ताचे स्वागत...

सागरने बोलवल्यामुळे मुक्ता आपल्या सासरच्या घरी येते. त्यावेळी 'वेलकम बॅक मुक्ता; असा बोर्ड लिहून सागर तिचे स्वागत करतो. घरातही सजावट केलेली असते. मुक्तालाही धक्का बसतो. त्याच वेळी इंद्रा येते आणि मुक्ताला पाहून तिलाही धक्का बसतो. घराची एवढी सजावट कशाला केलीय, ही काय करते इथे असे विचारते. त्यावर सागर तिला कळेल लवकरच असे सांगतो. स्वातीदेखील नाराजी व्यक्त करते. मुक्ता घरी जायला निघते. त्यावरही सागर मुक्ताला थांबवतो. कार्तिक जायला निघतो तेव्हा सागर त्याला थांब जरा पाच मिनिटाची फिल्म पाहून घे सांगतो. 

सागर उघड करणार कार्तिकचा चेहरा...

घरातील सगळ्या लोकांसमोर सागर कार्तिकचा विकृत चेहरा उघड करतो. आरती आणि त्याचे बोलणं सागरने रेकोर्ड केलेले असते. तेच सगळ्या घरातील लोकांना सागर दाखवतो. आपलं पितळ उघडं पडल्याचे पाहून  कार्तिकचा चेहरा पांढरा पडतो. सागर आरतीला घरी बोलावतो. आरतीदेखील कार्तिकचे कारनामे घरातील लोकांना सांगते आणि त्याने केलेल्या छळाची कहाणी घरातील लोकांसमोर सांगते. त्याच वेळी आरती खोटी पोलीस तक्रार केल्याबद्दल मुक्ताची माफी मागते. कार्तिकचे कारनामे समोर आल्यानंतर घरातील लोकांना धक्काच बसतो. 

सागर लगावणार कार्तिकच्या कानशिलात...

कार्तिकला एक्सपोज केल्यानंतर सागर आक्रमक होतो. मुक्तावर हात टाकणाऱ्या कार्तिकला सागर जोरदार कानशिलात लगावतो. माझ्या पत्नीवर हात टाकलास, बहिणीचा विश्वास मोडला असल्याचे सांगत सागर कार्तिकला कानशिलात लगावतो. सागरचा संताप पाहून घरातील इतर सदस्यही शांत बसतात. 

बापू देखील आपला संताप व्यक्त करतात. कोळी कुटुंबाकडे पुरू आणि माधवी येतात. सागर त्यांना मुक्ताचा दोष नसल्याचे सांगतो. त्यावर पुरूदेखील माझ्या मुलीवर हात टाकला म्हणून कार्तिकच्या कानशिलात लगावतात. सागर कार्तिकला पोलिसांच्या ताब्यात देतात. पोलीस कार्तिकला अटक करून घेऊन जात असताना दुसरीकडे इंद्रा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते. माझा जावई देवमाणूस असल्याचे सांगते. कार्तिकही सागर आणि मुक्ताने मला फसवले असल्याचे सांगतो, पण पोलीस ऐकत नाही. त्याला घेऊन जातात. 

माधवी विचारणार सागरला जाब...

माधवी सागरला जाब विचारते. तुम्हाला मुक्ता निर्दोष आहे हे सगळं माहीत असताना तुम्ही शांत का बसलात असे माधवी सागरला विचारते. त्यावर सागर मला पुराव्यासह कार्तिक उघडे पाडायचे होते असे सांगतो. मी कधीही मुक्ताला सोडणार नसल्याचा शब्द दिला होता, त्याची आठवणही सागर माधवीला करून देतो. 

मुक्तावर झालेल्या आरोपांवर बापू पुरू आणि माधवीची माफी मागतात. त्यावर पुरू सागरने सगळ्यांसमोर मुक्ता निर्दोष असल्याचे सिद्ध केल्याबद्दल सागरचे आभार मानतो. मला स्वाती आणि तिच्या मुलीबद्दल वाईट असल्याचे पुरू सांगतो. 

पाहा व्हिडीओ : प्रेमाची गोष्ट | Premachi Goshta | Latest Episode 207 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget