एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : घटस्फोटांच्या कागदावर सही करण्यास कार्तिकचा नकार, सावनी भरणार स्वातीचे कान

Premachi Goshta Serial Update : स्वातीच्या घटस्फोटावरून आता कोळी कुटुंबात तणाव दिसत आहे. तर, दुसरीकडे याचा फायदा घेऊन सावनी मुक्ताविरोधात स्वातीचे कान भरणार आहे.

Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत सध्या कथानकाच्या मध्यवर्ती स्वाती आली आहे. स्वातीने कार्तिकपासून घटस्फोट घ्यावा यासाठी सागर आग्रही आहे. तर, मुक्ता ही घटस्फोटाच्या निर्णयावर घाई न करता स्वातीने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे या मतांची आहे. यावरून मुक्ता-सागरमध्ये वाद झाले आहेत. तर, या सगळ्या घटनांचा सावनी आपल्यासाठी प्रयत्न करणार आहे. आजचा एपिसोडही कार्तिक-स्वातीच्या घटस्फोटाभोवती असणार आहे. 

घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वातीची सही, कार्तिकचा नकार 

सागर स्वातीला घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करण्यास सांगतो. स्वाती त्याला नको असे करू म्हणतो.  मी तुझी जबाबदारी घेईल असे सागर म्हणतो. सागरच्या सांगण्यावरून स्वाती घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करते. इंद्रा स्वातीला तू सही कशाला करते असे विचारते. त्यावर स्वाती मला काय वाटतं यावर कोण विचार करतो असे म्हणते आणि निघून जाते. 

कार्तिकची सही घेण्यासाठी सागर त्याची भेट घेतो. कार्तिक घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करण्यास नकार देतो. तू मला सगळ्यांसमोर कानशिलात लगावली हे विसरलो नसल्याचे कार्तिक सांगतो. सागरही त्याला चिडून उत्तर देतो. माझ्या बहिणीची फसवणूक केलेली मला आवडत नाही. तुला सोडणार नसल्याचे सागर म्हणतो. कार्तिकही ताठर भूमिका घेतो आणि घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करण्यास नकार देतो. 

कार्तिक करणार सावनीला विनंती 

सागर निघून गेल्यानंतर इकडं कार्तिक सावनीला फोन करतो आणि तुरुंगातून सोडवण्यासाठी विनंती करतो. लवकरात लवकर तुरुंगात बाहेर काढ मला काहीच सुचत नाही असे कार्तिक सावनीला सांगतो. सावनी त्याला मदतीचे आश्वासन देते. पण, सावनीच्या आपल्या मनात दुसराच कट शिजवते. 

सावनी भरणार स्वातीचे कान

सावनी घरी स्वातीची भेटून तिला आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करते. सावनीला पाहून इंद्राला राग येतो. सागरच्या डोक्यात मुक्ताने भरवले आहे, त्यामुळेच कार्तिक तुरुंगात गेला असल्याचे सावनी म्हणते. सावनी इंद्रा आणि स्वातीच्या डोक्यात मुक्ताच्या विरोधात राग भरते. तुमची नवीन सून घर मोडायला निघाली असल्याचे सावनी म्हणते. त्यावर इंद्राला तिला दोन शब्द सुनावते आणि तू आमचं डोक भडकवू नकोस असे इंद्रा म्हणते. स्वातीलादेखील हिचे बोलणं मनावर घेऊ नकोस असेही इंद्रा बजावते. तर, कार्तिकला तुरुंगात सोडवण्यासाठी मीच सोडवण्यासाठी मदत करू शकते असेही सावनी स्वातीला सांगते. 

मुक्ता स्वातीला देणार बिझनेस आयडिया...

स्वातीने स्वाभिमान जपत आपल्या पायावर उभं राहावे यासाठी मुक्ताचा आग्रह धरते. त्यासाठी मुक्ता स्वातीला क्लाउड  किचनची आयडिया देते. सागरप्रमाणे तू देखील यशस्वी व्यावसायिक होशील असे मुक्ता म्हणते. त्यावर इंद्रा संताप व्यक्त करते. माझ्या मुलीला आता तू काम करायला सांगणार का, तिची काळजी घ्यायला तिचा भाऊ, घरातले सक्षम असल्याचे इंद्रा सांगते. इंद्रा मुक्ताला उलटसुलट बोलते. 

तेवढ्यात सागर त्रासिक चेहऱ्याने घरी येतो. मुक्ता त्याला कारण विचारते तेव्हा तो कार्तिकने घटस्फोटाच्या कागदपत्रावर सही करण्यास नकार दिल्याचे सांगतो. स्वाती मनात खूश होते आणि मला कार्तिक कधीच सोडणार नसल्याचे सांगते. 

श्रीकांत भोसले
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget