एक्स्प्लोर

Premachi Goshta Serial Update : मुक्ताला कळणार हर्षवर्धनचं खरं रुप, माधवीच्या घरी राहण्यासाठी येणार सावनी

Premachi Goshta Serial Update : माधवी सावनीला धडा शिकवणार का, हर्षवर्धनचा डाव मुक्ताला कळणार का, हे सगळं प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत नवं वळण येत आहे. माधवीच्या घरी सावनी राहायला येणार आहे,  माधवी सावनीला धडा शिकवणार का,  हर्षवर्धनचा डाव मुक्ताला कळणार का, हे सगळं प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. 

माधवी देणार सावनीला राहण्यास परवानगी

सावनीला घरात राहू देण्यास माधवीचा विरोध असतो. मुक्ता माधवीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यावर माधवी म्हणते की विषाची परीक्षा कोण घेणार? तेवढ्यात सागरही तिथे येतो आणि तोही मुक्ताच्या प्रस्तावाला विरोध करतो. पुरू देखील माधवी आणि सागरच्या बोलण्याशी सहमत होतात. पुरू सावनी हॉटेलमध्ये राहिले असे सांगतो. त्यावर मुक्ता म्हणते की प्रश्न फक्त तिच्या एकटीचा नाही तर आदित्यचा देखील असल्याचे सांगते. आदित्य देखील तिच्यासोबत आहे असे सांगते. 

आदित्यचे नाव ऐकताच घरातले सगळेजण  गोंधळात पडतात. आदित्यची काय चूक आहे, असे पुरू म्हणतो. मुक्ताही आदित्यसाठी काही निर्णय घ्यावे लागतील असे म्हणते. मुक्ताच्या बोलण्यावर सागर म्हणतो की, आदित्यचा एवढा विचार तिची सखी आईदेखील करणार नाही. माधवीदेखील अखेर परवानगी देते. पण, माधवीच्या मनात दुसरंच काही ठरत नाही. 

हर्षवर्धन सावनीपासून पिच्छा सोडणार?

मुक्ताच्या घरी राहण्यावरून सावनीला धक्का बसतो. त्यावर मिहिर तिची समजूत काढतो. सईसोबत खेळायला मिळेल, माधवी आजी लाड करणार यामुळे आदित्य खूश होतो. तेवढ्यात हर्षवर्धन येतो आणि सावनीसोबत फ्लर्ट करतो. हर्षवर्धनच्या बोलण्याला सावनी भुलते.  हर्षवर्धन खरंच आपल्यावर एवढं प्रेम करतोय असं तिला वाटू लागते. इकडं मनातल्या मनात हर्षवर्धन खूश होतो. 

माधवीच्या सावनीला सूचना

सावनी आदित्य हे मुक्ताच्या घरी येतात. मुक्ता हे सावनी आणि आदित्यशी बोलते, त्यांना काही हवं नको ते पाहते. त्याच वेळी आदित्य पुस्तक असलेली बॅग घरीच विसरलो असल्याचे सांगते. त्यावर मुक्ता क्लिनिकमधून येताना ती बॅग आणेल असे सांगते आणि क्लिनिकला जाते. माधवी ही सावनीची फिरकी घेत असते. सावनीला काही गोष्टी माधवी समजावून सांगते. स्वत:ची  कामे स्वत: करावी लागतात. काही खायचे असेल तर स्वत: किचन मध्ये पदार्थ तयार करावेत, सारखंसारखं ऑर्डर करू नये अशा अनेक सूचना माधवी सावनीला करत असते.

हर्षवर्धनचा डाव मुक्ताला कळणार

इकडं मुक्ता हर्षवर्धनच्या घरी आदित्यची पुस्तकाची बॅग घेण्यास येते. त्यावेळी हर्षवर्धन एका मुलीसोबत बोलत असतो. हर्षवर्धनला लग्न करायचे नाही हे मुक्ताला समजते. हर्षवर्धनचा खरा चेहरा समोर येतो. सागरला हर्षवर्धनचे खरे रुप सांगावे लागेल असे मुक्ता म्हणते. 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dahisar Voting Controversy : केंद्रावर जाण्याआधीच झालं होतं मतदान,स्थानिकांचा मोठा दावाSaleel Kulkarni on Election : तक्रार नंतर करा आधी मतदान करा! सलील कुलकर्णींचं तरुणांना आवाहनJay Pawar Shrinivas Pawar: दादांचा लेक लाखात एक..!भर रस्त्यात जय पवारांचा श्रीनिवास पवारांना नमस्कारVotting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
Embed widget