Premachi Goshta Serial Update : मुक्ता मागणार सावनीची माफी, आदित्यच्या उत्तराने हर्षवर्धनचा चेहरा पडणार
Premachi Goshta Serial Update : मुक्ता सावनीची माफी मागणार आहे. मुक्ताच्या या कृतीवर मिहिर-मुक्ता चिडतात. तर, दुसरीकडे सावनीला भेटायला आलेल्या हर्षवर्धनला आदित्यने दिलेल्या उत्तरामुळे सावनी-हर्षचा चेहरा पडतो.
Premachi Goshta Serial Update : हर्षवर्धन फसवत असल्याचे सांगितल्याबद्दल मुक्ता सावनीची माफी मागणार आहे. मुक्ताच्या या कृतीवर मिहिर-मुक्ता चिडतात. तर, दुसरीकडे सावनीला भेटायला आलेल्या हर्षवर्धनला आदित्यने दिलेल्या उत्तरामुळे सावनी-हर्षचा चेहरा पडतो. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आज काय पाहणार?
जेवण करत असताना मुक्ताचा हात भाजल्याने सागरला चिंता वाटते. सागर आणि सई मुक्ताच्या भाजलेल्या हाताला मलम लावतात आणि हळूवार फुंकरही मारतात. त्यावेळी मुक्ता मनात सागरबद्दल बोलताना तुमच्यासारखा काळजी घेणारा नवरा असेल तर कसलाच त्रास होणार नाही. किचनमध्ये तेवढ्यात इंद्रा येते आणि एवढं पाणी कसं सांडले असे विचारते. त्यावर सागर मु्क्ताला भाजलं असल्याचे सांगतो. इंद्रा त्यावर मुक्ताला बोल लावते. भाजणं वगैरे हे सगळे काम न करण्याची कारणे आहेत असे इंद्रा बोलते. इंद्रा मुक्ताला किचनमधून बाहेर जाण्यास सांगते. सागर आणि मुक्ता किचन बाहेर जातात.
मिहिर सुनावणार सावनीला
इकडं सावनीने मुक्ताला उलटसुलट बोलण्याने मिहिर दुखावतो. सगळं स्वत:च्या डोळ्यांनी पाहूनही हर्षवर्धनवर विश्वास ठेवल्याने मिहिर सावनीला सुनावतो. तर, हर्षवर्धनच्या घरी मी तमाशे केले नाही. तर, मुक्ता आणि सागरने तमाशे केले असल्याचे सावनी सांगते. मुक्तालाच माझे काही चांगले झालेले पाहावत नाही असे सावनी म्हणते. माझं जरा काही भलं होत असते तर मुक्ता नाक खुपसते असे सावनी म्हणते. मुक्ताबद्दल सावनी नको ते बोलत असताना माधवी हे ऐकते आणि हे गोखलेंचे घर आहे, जरा सांभाळून असे सावनीला म्हणते.
सावनी इथे का आलीय असे विचारते. तू आणि मुक्ताने तिला इथे राहायला सांगितले आहे म्हणून ही सावनी राहतेय असे माधवी म्हणते. त्यावर तुम्ही हे सगळं उपकार केल्यासारखे का बोलताय असे सावनी म्हणते. माधवी आणि सावनीमध्ये चकमक झडत असताना सावनी घर सोडून जाण्याचा निर्णय सांगते. त्यावर माधवीही सगळ्यांनाच मनस्ताप होणार असल्याने त्यांचा निर्णय आहे. सावनी आणि माधवीमध्ये वादावादी होत असते.
सावनी बॅग घेऊन जात असताना आदित्य घरात येतो आणि आपण कुठे चाललोय हे विचारतो. त्यावर सावनी आपण हॉटेलमध्ये राहण्यासाठी जात आहोत, असे सांगते. आपण मिहिर मामाच्या घरी जाणार होतो, त्यानंतर इकडे आलो आणि आता हॉटलेला जाणार. आपल्याला स्वत:चे घर नाही का, असा प्रश्न करतो. त्याच वेळी मुक्ता येते आणि आदित्यला स्वत:ची दोन घरे असताना तो कुठेही जाणार नाही असे सांगते. आदित्य मुक्ताला उलट उत्तरे देतो. सईने खेळायला बोलावले आहे असा निरोप मुक्ताने सांगितल्यावर आदित्य सईकडे जातो.
मुक्ता मागणार माफी
मुक्ता सावनीची माफी मागते आणि घर सोडून न जाण्यासाठी सांगते. हर्षवर्धन बद्दल जे सांगितले, आई जे बोलली त्याबद्दल मी माफी मागत असल्याचे मुक्ता म्हणते. सावनी आपली बॅग घेऊन बेडरुममध्ये जाते. मुक्ताच्या माफी मागण्यावर मिहिर चिडतो आणि वहिनी कधी कधी तू एवढी चांगली वागतेस की मला तुझाच राग येतो असे म्हणतो आणि घरातून बाहेर जातो.
माधवीदेखील मिहिरच्या म्हणण्याला दुजोरा देते. त्यावर मुक्ता माधवीची समजूत काढते आणि आदित्यसाठी आपल्याला सावनीला सहन करावे लागेल असे सांगते. हर्षवर्धन सावनीला फसवत असल्याचे माधवीला सांगते. हर्षवर्धनचा खरा चेहरा सावनीसमोर नक्की आणेन असे मुक्ता माधवीला सांगते.
आदित्यच्या उत्तराने हर्षवर्धन-सावनीचा चेहरा पडला...
हर्षवर्धन सावनीला भेटण्यासाठी गोखलेंच्या घरी येतो. त्यावेळी सावनीला आनंद होतो. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे माझ्याशिवाय इतर कोणालाही कळणार नाही असे सावनी म्हणते. आपलं प्रेम हे दिखाव्यासाठी नाही. नाहीतर नजर लागली असती असे सावनी बोलते पण तिच्या बोलण्यात मुक्ताला टोमणा असतो. तेवढ्यात आदित्य येतो. हर्षवर्धन त्याच्यासोबत बोलत असतो. त्यावेळी मला हर्ष अंकल नको म्हणून मी तुझा पप्पा आहे असे सांगतो. त्यावर आदित्य माझ्यासाठी सागर हेच पप्पा आहेत असे सांगतो.