Premachi Goshta Serial Update : सागर-मुक्ता सावनीला सांगणार हर्षवर्धनचे सत्य, 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Premachi Goshta Serial Update : हर्षवर्धनचे सत्य मुक्ता सागरला सांगणार आहे. त्यानंतर दोघेही जण सावनीला हर्षवर्धनचे सत्य सांगतात. आता सावनी काय करणार, मुक्ता-सागरवर विश्वास ठेवणार का, हर्षवर्धनचा कट उघडकीस येणार का?
Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत आता नवं वळण येणार आहे. हर्षवर्धनचे सत्य मुक्ता सागरला सांगणार आहे. त्यानंतर दोघेही जण सावनीला हर्षवर्धनचे सत्य सांगतात. आता सावनी काय करणार, मुक्ता-सागरवर विश्वास ठेवणार का, हर्षवर्धनचा कट उघडकीस येणार का, हे सगळे आजच्या एपिसोडमध्ये पाहता येणार आहे.
माधवी घडवणार सावनीला अद्दल...
कोशिंबिरसाठी असलेली काकडी सावनी आपल्या फेसपॅकसाठी ती काकडी वापरते. हे पाहून माधवी चिडते. मुक्ता कोणालाही घरात आणते. काबाडकष्ट करणाऱ्या बायकांची त्वचा देखील हिच्यापेक्षा जास्त चांगली असेल असे माधवी म्हणते. सावनीला धडा शिकवण्यासाठी माधवी मिरचीची धुरी घरात करते. यामुळे सावनीला खोकला, शिंका येण्यास सुरुवात होते. सावनीला हे सहन होत नाही. मच्छरांच्या उपायासाठी हे केले असल्याचे माधवी सावनीला सांगते.
तेवढ्यात मुक्ता घरात येते. मुक्ता सावनीची विचारपूस करत आजचा दिवस कसा गेला हे विचारते. पण, सावनी मुक्तावर चिडते आणि तू साळसुदपणाचा आव आणते. तुझा आणि तुझ्या आईचा माझ्याविरोधात कट असल्याचे सावनी म्हणते. सावनी खोकून आणि शिंका येऊन बेजार झाले असते. माधवीला मुक्ता बोलावून घेते आणि काय झाले हे विचारते. त्यावेळी माधवी मच्छरांना पळवण्यासाठी धूप केला असल्याचे सांगते. बोलण्याच्या ओघात मिरचीची धुरी असल्याचे ती सांगते. मिरचीची धुरी असल्याने मच्छर आणि घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते असे माधवी सांगते. माधवीच्या बोलण्यातला उपरोधिकपणा मुक्ताच्या लक्षात येतो. त्यावर मुक्ता सध्या लग्नघर असल्याने नवीन प्रयोग नको असे मुक्ता सांगते.
मुक्ता सागरला सांगणार हर्षवर्धनचे सत्य
इकडे घरात सई आणि आदित्य खेळत असतात. सोबत सागरही असतो. तेवढ्यात मुक्ता येते, मुक्ताला पाहून आदित्य चिडतो आणि निघून जातो. आदित्यच्या वागण्यावर सागर मुक्ताकडे दिलगिरी व्यक्त करतो. पण, मुक्ता सागरला हर्षवर्धनबद्दल सांगते. हर्षवर्धन हा सावनीला फसवत असल्याचे मुक्ता सांगते. त्यावर सागर सांगतो की सावनीनेदेखील कोणाला फसवले आहे, त्यामुळे तिच्यासोबतही तेच होत आहे. त्यामुळे मला याचे काही वाटत नाही. पण, सावनीला काही झाले तर त्याचा परिणाम आदित्यवरही होईल असे मुक्ता सांगते. त्यामुळे सागर-मुक्ता ही गोष्ट सावनीला सांगण्याचा निर्णय घेतात. पण, तेवढ्यात मुक्ताचा पाय घसरतो आणि सागर सावरण्यास जात असताना दोघेही पडतात. दोघांमध्ये रोमँटिक क्षण येत असताना तेवढ्यात इंद्रा आणि स्वाती येते. इंद्रा सागरला बडबडते.
सावनीला सागर सांगणार हर्षवर्धनचे सत्य...
सागर-मुक्ता सावनीला हर्षवर्धनबाबत सत्य सांगण्यास जाते. पण, सावनी मुक्तालाच उलटं बोलते. सागर हस्तक्षेप करतो आणि मला आदित्यची काळजी वाटत असल्याचे सांगतो. त्यावर सावनी हर्षवर्धनच्या घरी जाऊयात असे सांगते आणि तिघेही घरी जातात.